जळगाव जिल्ह्यात उद्दीष्टापैकी ९९.९६ टक्के निधी मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 06:27 PM2023-04-02T18:27:42+5:302023-04-02T18:28:05+5:30
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९९.९६ टक्के निधीचे विनियोजन करून संबंधित यंत्रणामार्फत निधी खर्च करण्यात यश मिळाले आहे.
कुंदन पाटील
जळगाव : गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९९.९६ टक्के निधीचे विनियोजन करून संबंधित यंत्रणामार्फत निधी खर्च करण्यात यश मिळाले आहे. सर्वसाधारण, अनु.जाती, आदिवासी भागासाठी ५९९ कोटी ५१ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ५९९ कोटी २५ लाखांची कामे मार्गी लागली आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीने लागोपाठ तिसऱ्या वर्षी ९९.९६ टक्क्यांपेक्षा जास्त निधीचा वापर करण्यात यश मिळविले आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा प्रशासनातील सहकाऱ्यांमुळे निधीचा विनियोग करण्यात यश आले आहे.
असा झाला निधी खर्च
सर्वसाधारण वर्गवारीसाठी ४५२ कोटींपैकी ४५२ कोटी, अनुसुचीत जाती-जमातींसाठी ९१ कोटी ५९ लाखांच्या निधी १०० टक्के खर्च झाला आहे. तर आदिवासी उपाययोजनांसाठी ५५ कोटी ९२ लाखांपैकी ५५ कोटी ६६ लाखांचा निधी वापरण्यात आला आहे.
गेल्या वर्षापेक्षाही यावर्षी ५ टक्क्यांनी निधीचा विनीयोग जास्त झाला असल्याने ९९ टक्क्यांपेक्षा जास्त कामांना गती मिळणार असल्याने याचे समाधान आहे. प्रशासनाने अचूक नियोजन केल्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे. - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील