निषेध कसला करताय, घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला : उद्धव ठाकरे
By admin | Published: July 12, 2017 05:44 PM2017-07-12T17:44:02+5:302017-07-12T17:44:02+5:30
अमरनाथ यात्रेकरूंना संरक्षण देता आले नाही का?
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.12- दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला जाणा:या भाविकांच्या बसवर हल्ला केला़ हिंदुस्थानवर हल्ले होत असतांना निषेध कसला करताय, जा़़़ घुसा आणि दहशतवाद्यांना गोळ्या घाला, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी शेतकरी संवाद यात्रेदरम्यान धुळ्यात केंद्र सरकारला दिल़े
आपल्या भाषणात ठाकरे म्हणले, बाळासाहेब असतांना त्यांनी अमरनाथ यात्रेला अडथळा आला तर हज यात्रा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती़ पण सध्या केंद्र सरकार अतिरेकी हल्ल्यांनंतर केवळ निषेधावरच समाधान मानत आह़े हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र आहे, म्हणूनच आम्ही मोहन भागवतांचे नाव राष्ट्रपती पदासाठी पुढे केले होत़े त्यामुळे निषेध कसला करताय, घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला असे आव्हान त्यांनी केंद्र सरकारला दिले.
कजर्माफीचा मुख्यमंत्र्यांना विधानसभेत जाब विचारणार
शेतक:यांना कजर्माफी जाहीर करण्यात आली असली तरी शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत़ त्यामुळे किती शेतक:यांना कजर्माफी मिळाली, याचा जाब मुख्यमंत्र्यांना विधानसभेत विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
..तर मंत्रालयासमोर ढोल बडवू
जिल्हा बँका कजर्वसुलीसाठी शेतक:यांच्या घरासमोर ढोल बडवितात म्हणून आम्ही राज्यभर जिल्हा बँकांसमोर ढोल बडविल़े परंतु तरीही कजर्माफीचा लाभ दिला गेला नाही तर मंत्रालयासमोर ढोल बडवू असे ठाकरे म्हणाल़े कजर्माफीच्या मागणीची फॅशन झाली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केल़े भाजप नेत्यांचे गोडवे गाणा:या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील त्यांनी टिकास्त्र सोडल़े
मोदींना शेतक:यांचे मन कळायला हवे
देशाचे पंतप्रधान मन की बात करीत असले तरी शेतक:यांनाही मन आहे, हे त्यांना कळायला हव़े शिवसेना शेतक:यांच्या कजर्माफीसाठी संघर्ष करीत असून त्यांचा आवाज बुलंद करीत आह़े अजित पवार यांनी शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याची टिका केल्याचे सांगत ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिल़े पवार यांनी केलेले वक्तव्य शेतकरी विसरले नसून जनतेने त्यांना लाथाडले आह़े भाजपने तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला असल्याने ते शिवसेनेवर टिका करीत असल्याचे ठाकरे म्हणाल़े
दानवेंवर अप्रत्यक्ष टिका
शेतक:यांना ‘साले’ म्हणतात, मग तुमच्यात अन् अजित पवारांमध्ये फरक काय? असा प्रश्न करीत उध्दव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली़
धुळे शहरातील बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या शेतकरी संवाद मेळाव्यास पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री दादा भूसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार निलम गो:हे, बबन थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिष महाले यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े