अमळनेर येथे दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:17 PM2018-06-02T13:17:35+5:302018-06-02T13:17:35+5:30

शेतकरी संप

Throwing milk and vegetables on the road | अमळनेर येथे दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध

अमळनेर येथे दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध

Next

आॅनलाइन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. २ - शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी अमळनेर तालुक्यातील शेतकºयांनी तहसील कार्यालयाबाहेर रस्ता रोको आंदोलन करून दूध, कांदे, टमाटे व भाजीपाला फेकून शासनाचा निषेध केला
शासनाने कर्जमाफी करूनही एक रुपया शेतकºयांना लाभ मिळाला नाही, बँकांना पैसे मिळाले, बँक शेयकºयांना कर्ज देत नाही, शेतकºयांना कर्जबुडवे ठरवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत तसेच ५ वर्षाच्या करारावर डाळी कडधान्य आयात करकीत असल्याने व साखर पाकिस्तानहुन मागवत असल्याने शेतकºयांच्या मालाला भाव मिळत नाही. हमी भावाचे गाजर दिले जात आहे, पाणी 20 रुपये लिटर आणि दुधाला 14 रुपये भाव आहे म्हणून राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी तहसील कचेरीसमोर रस्ता रोको करून निषेध म्हणून दूध, कांदे, टमाटे, भाजीपाला रस्त्यावर फेकले. त्यानंतर प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सरसकट कर्जमाफी, उत्पन्नाची हमी, शेतकºयांना पेन्शन द्यावे , शेती पंपासाठी मोफत वीज द्यावी बैलगाडी शर्यतीला कायदेशीर मान्यता द्यावी या मागण्यांचा समावेश आहे आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, पं.स. चे माजी सभापती संदीप पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील , संभाजी ब्रिगेड चे अनंत निकम, सुभाष पाटील, महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, आशा चावरिया , अ‍ॅड गिरीश पाटील, डी ए धनगर, पं स सदस्य विनोद जाधव, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पाटील, विजय पाटील, एस बी पाटील , सुरेश पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर , स पो नि एकनाथ ढोबळे ,प्रवीण पारधी , सचिन पाटील, भूषण पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनांनातर न.प. ने तातडीने रस्त्यावरील भाजीपाला, कचरा साफ केला

Web Title: Throwing milk and vegetables on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.