९० लाखांचा कापूस घेऊन पसार झालेल्या ठगास अटक 

By चुडामण.बोरसे | Published: January 28, 2023 04:50 PM2023-01-28T16:50:38+5:302023-01-28T16:51:45+5:30

वाडी ता. पाचोरा येथील शेतकऱ्यांकडील ८५ ते ९० लाखांचा कापूस घेऊन फरार झालेल्या ठगास नवसारी येथून अटक करण्यात आली आहे. 

thug who got away with cotton worth 90 lakhs was arrested | ९० लाखांचा कापूस घेऊन पसार झालेल्या ठगास अटक 

९० लाखांचा कापूस घेऊन पसार झालेल्या ठगास अटक 

googlenewsNext

पिंपळगाव (हरेश्वर) जि. जळगाव : वाडी ता. पाचोरा येथील शेतकऱ्यांकडील ८५ ते ९० लाखांचा कापूस घेऊन फरार झालेल्या ठगास नवसारी येथून अटक करण्यात आली आहे. 

राजेंद्र भीमराव पाटील (३४, रा. वाडी- शेवाळे ता. पाचोरा) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी वाडी - शेवाळे आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडील ८५ ते ९० लाख रुपये किंमतीचा कापूस उधार खरेदी करून तो पसार झाला होता.  कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.  पैसे परत मिळावेत, यासाठी  वाडी येथील शेतकऱ्यांनी अनेक दिवस उपोषणही केले होते.  काबाडकष्ट करून पिकविलेल्या कापसाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. 

राजेंद्र हा नवसारी (गुजरात) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नवसारी येथे पोलीस पथक रवाना करण्यात आले. तिथून त्याला अटक करुन पिंपळगाव येथे आणण्यात आले. त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 
सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय अमोल पवार, मुकेश लोकरे, जितेंद्र पाटील, रणजीत पाटील, शिवनारायण देशमुख, उज्वल जाधव, अभिजीत निकम, प्रवीण देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: thug who got away with cotton worth 90 lakhs was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.