30 हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर व्यापा:यांच्या घशात

By admin | Published: April 27, 2017 12:34 AM2017-04-27T00:34:08+5:302017-04-27T00:34:08+5:30

शासनाकडून विपणनाचा खेळखंडोबा तीन चे 13 हजार हेक्टर क्षेत्र झाल्याने तुरीचे वाळूसारखे उत्पादन

Thur business more than 30 thousand quintals: in their throat | 30 हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर व्यापा:यांच्या घशात

30 हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर व्यापा:यांच्या घशात

Next

जळगाव : जिल्हाभरात 2016 च्या हंगामात तुरीचे क्षेत्र 2015 च्या खरिपाच्या तुलनेत तब्बल 10 हजार हेक्टरने वधारून 13 हजार हेक्टवर गेले. तुरीचे एक लाख 30 हजार क्विंटल एवढे उत्पादन आले. पण तूर खरेदी केंद्रांबाबत स्थिती बिकट असल्याने या शासकीय खरेदी केंद्रांवर फक्त 22 एप्रिलअखेर 86 हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. उर्वरित 30 हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर व्यापा:यांच्या घशात कवडीमोल दरात म्हणजेच 3800 ते 4000 रुपये क्विंटलप्रमाणे विकावी लागली.
तूर खरेदी केंद्र 22 रोजी बंद झाल्याने जामनेर, बोदवड व मुक्ताईनगर या तीन शासकीय तूर खरेदी केंद्रांवर 11 हजार क्विंटल तूर मोजणीविना पडून आहे.  या वृत्तास जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने दुजोरा दिला आहे. 
जळगाव येथे भारतीय अन्न महामंडळाचे तूर खरेदी केंद्र होते. तर जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा, रावेर  व अमळनेर येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू होते.
जळगाव केंद्र तीन महिन्यात सुटय़ांचे दिवस वगळता फक्त 45 दिवस सुरू होते. फेब्रुवारी महिन्यात या केंद्रात शेतकरी व केंद्रसंचालकांमध्ये वाद झाल्याने हे केंद्र आठवडाभर बंद केले. तर इतर सर्व केंद्र हे नाफेडचे होते. त्यातील अनेक केंद्र जवळपास 20 ते 22 दिवस बारदानाअभावी बंद होते.
आदेशांचे पालन केलेच नाही
पालकमंत्री यांनी मागील आठवडय़ात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जेवढी वाहने तूर विक्रीसाठी केंद्राच्या आवारात येतील त्या सर्व वाहनांमधील तुरीची मोजणी करावी.. रात्रीर्पयत खरेदी सुरू राहिली तरी केंद्र सुरू ठेवावेत, असे आदेश दिले होते.
परंतु या आदेशांचे पालन संबंधित तूर खरेदी केंद्रांवर झालेले नसल्याची माहिती काही शेतक:यांनी दिली आहे.
2015 मध्ये तुरीचा तुटवडा होता. त्यामुळे 2016 च्या खरीप हंगामात शासनाने तुरीच्या विक्रमी उत्पादनासाठी कार्यक्रम राबविला. जिल्हाभरात 200 हेक्टरसाठी मोफत संकरित तुरीचे बियाणे दिले. तसेच 200 हेक्टरसाठी तुरीच्या रोपांचे मोफत वितरण केले. तुरीची रोपे तयार करण्यासाठी शासनाने शेडनेटधारक शेतक:यांना मदत केली. यामुळे  तुरीचे क्षेत्र वधारले. ते 2015 च्या खरिपाच्या तुलनेत 10 हजार हेक्टरने वधारून 13 हजार हेक्टरवर पोहोचले. संकरित तुरीमुळे हेक्टरी एक लाख 30 हजार क्विंटल एवढे उत्पादन आले.
22 रोजी शासनादेशानुसार तूर खरेदी केंद्र बंद केले. नाफेडच्या तीन केंद्रांवर 11 हजार क्विंटल तूर पडून आहे. तिची खरेदी करावी की नाही याबाबत शासनाने आदेश दिलेले नाहीत. इतर कुठल्याही केंद्रावर मात्र तूर पडून नाही.
-एस.पी.माळी, विपणन अधिकारी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन

Web Title: Thur business more than 30 thousand quintals: in their throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.