गुरूवार ठरला विविध आंदोलनांचा वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 12:47 AM2017-01-06T00:47:30+5:302017-01-06T00:47:30+5:30
विविध मागण्यांसाठी लढा : श्रमीक महासंघ, ग्रामपंचायत कर्मचारी व महावितरण वर्कर्स फेडरेशनचे आंदोलन
जळगाव : प्रलंबित मागण्यांसाठी शहरात गुरूवारी लालबावटासह विविध संघटनांतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनांमुळे गुरूवार हा आंदोलनवार ठरला़ यात घरकामगार तसेच असंघटीत कामगारांचा प्राधान्य गटात समावेश करावा यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, पगाराच्या अनुदान व भविष्य निर्वाह निधीच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने, सोलापूर जिल्ह्यातील पानसरे या अभियंत्याच्या आत्महत्येप्रकरणी तेथील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे धरणे तर समान काम समान वेतनासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे जिल्हाधिका:यांना निवदेन देण्यात आल़े
महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ
शहरातील कष्टकरी घरकामगारांना व असंघटीत कामगारांचा प्राधान्य गटात समावेश करून त्यांना प्रती माणूस पाच किलो धान्य वितरीत कराव्यात या मागणीसाठी महराष्ट्र राज्यसर्व श्रमिक महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात येवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल़े 13 ऑक्टोबर रोजीचा शासन निर्णय असून धान्य वितरीत करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत़ त्यांची अंमबजावणी व्हावी असे निवेदनात नमूद आह़े तसेच नोटबंदीच्या निर्णयामुळे कामगारांचे नुकसान झाले आह़े या निर्णयामुळे काही कामगारांना घरी बसावे लागले आहे, त्यांना भत्ता देण्यात यावा यासह इतर मागण्यांचे निवदेन यावेळी महासंघातर्फे जिल्हाधिका:यांना देण्यात आल़े
राज्य ग्रा़पं़कर्मचारी महासंघ
हगणदारी मुक्तीचे काम अपूर्णतेच्या नावाखाली ग्रामपंचायत कर्मचा:याचे पगाराचे अनुदान जिल्हा परिषद प्रशासनाने रोखून धरले होत़े यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होतो़ गुरूवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांनी तीन कोटी 40 लाख रूपयांचे अनुदान रिलीज करण्याचे आश्वासन पदाधिका:यांना दिल़े यानंतर नियोजित आंदोलन मागे घेण्यात आल़े 15 जानेवारीच्या आत पगाराचे अनुदान ग्रामपंचायत कर्मचा:यांच्या हातात न पडल्यास व किमान भविष्य निर्वाह निधीची पूर्तता न केल्यास 16 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही संघटनेतर्फे यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला़ जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केल़े मुरलीधर जाधव, राजू कोळी, शिवशंकर महाजन, सुभाष पाटील, वासू वारके, विजर रल, सुनील कोळी, प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर सावळे उपस्थित होत़े