पाचोरा तालुक्यात कपाशीवर लाल्या रोगाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:05 PM2019-11-16T13:05:18+5:302019-11-16T13:07:11+5:30
शेतकरी चिंतातूर
सातगाव डोंगरी, जि. जळगाव : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरासह तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या रोगाने थैमान घातले असून बळीराजा चिंतातूर झाला आहे.
खान्देशातील नगदी पीक म्हणून शेतकरी कपाशी पिकाची लागवड करत असतो. मागील वर्षी ज्यांच्या विहिरींना थोडंफार पाणी होतं. अशा शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व कपाशीची लागवड केली होती. मात्र भर दिवाळीतही अवकाळी पावसाने मान्सून पूर्व कपाशी पूर्णपणे सडून गेली. पावसाळ्याचे जवळपास पूर्ण दिवस पाऊस पडत राहिल्याने, कपाशी पिकाची उंची वाढत गेली आणि उंची मुळे शेतकऱ्यांच्या चेहºयावर आनंद द्विगुणित होत गेला. मात्र अतिपावसाने कपाशीला फुलांचा बरच आला नाही. त्यामुळे काही वीस- पंचवीस टक्केच बोंडे पक्के होण्याचा प्रसंग कपाशी पिकावर अर्थात बळीराजाला आला. यामध्ये तर सातगाव डोंगरी, पिंप्री, सारवे, वाडी, शेवाळे, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, लोहारी, वरखेडी, पिंपळगाव हरे. वडगाव कडे, वरसाडे, आदी गावे अजिंठा पर्वताच्या जवळच असल्याने जमिनी हलक्या स्वरूपाची असल्याने सदर जमिनी मध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने कपाशी पिके अकाली लाल पडली. त्यामुळे २० टक्के सुद्धा कपाशीचे उत्पादन येईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
अनेक शेतकरी कपाशीचा दुसरा बहार घेण्याच्या तयारीत असतात. मात्र त्यासाठी कपाशीचे झाड हे हिरवे असणे आवश्यक असते. तरच दुसरा बहारा घेता येतो. आता तर कपाशी पूर्णपणे लाल पडल्याने झाडाला दुसरा बहार फरदड म्हणून घेता येणार अशक्य वाटत आहे. त्यामुळे कपाशीचे पीक उपटून टाकल्याशिवाय सध्या तरी पर्याय दिसत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.