टायगर अभी जिंदा है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 08:51 PM2019-05-30T20:51:25+5:302019-05-30T20:52:20+5:30

वढोदा वनक्षेत्र : पट्टेदार वाघाचा दीड दशकापूर्वीचा अधिवास

Tiger is still alive ... | टायगर अभी जिंदा है...

टायगर अभी जिंदा है...

googlenewsNext
ठळक मुद्देबिबट्याला जीवनदानासाठी असाही प्रयत्त्न

मतिन शेख।

मुक्ताईनगर : पट्टेदार वाघाचा दीड दशकापूर्वीचा अधिवास, वढोदा जंगलातील धोक्यात आलेली संपन्न जैवविविधता आणि जंगलातील काही प्रमाणात तुटलेली अन्नसाखळी व पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी परिस्थिती आहे. मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्षात अजूनही ‘टायगर अभी जिंदा है...’ मात्र वन्यप्राणी व जैवविविधता वाचविण्यासाठी शासन- प्रशासन व सर्वसामान्य नागरिकांच्या पुढाकाराची गरज आहे.
पट्टेदार वाघाच्या दीड दशकापूर्वीचा अधिवास असलेल्या व तालुक्यात बिंदू ठरलेल्या वढोदा संपन्न जैवविविधता धोक्यात आली आहे. जंगलातीलही अन्नजाळे,अन्नसाखळी कमालीची प्रभावित झाली आहे. यात नैसर्गिक जलसाठ्यांचे अस्तित्व संपुष्ठात आले आहे. परिणाम स्वरूप काही वन्य प्राण्यांचे या भागातून स्थलांतर झाले. जैवविविधता व जंगलाच्या सहजीवनाचा या प्रवासाला जंगल संरक्षणासाठी नव्या उमेदीने जागर करण्याची गरज आहे.
३० आॅक्टोबर २०१६ रोजी रामगड शिवारात विहिरीत बिबट्या पडला. त्याला पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली. अवघ्या काही फुटावरून विहिरीतील बिबट्या पाहण्याची अनेकांना संधी मिळाली. त्यानंतर विहिरीत शिडी सोडून परिसर निर्मनुष्य करण्यात आला. अंधार पडताच बिबट्या शिडी चढून सुरक्षित जंगलात गेला. वनविभागाने अशा प्रकारे बिबट्याला सुखरूप बाहेर काढले होते.
१८ वर्षापूर्वी या जंगलात दिसून आलेल्या पट्टेदार वाघ आणि त्यानंतर पट्टेदार वाघांना अधिवासासाठी भावलेल्या या जंगलात असे रुळले आहेत की अवघ्या तीन किलोमीटर क्षेत्रात एकापेक्षा जास्त पट्टेदार वाघ अनेक वेळा दिसून आले आहेत.
अधून मधून दर्शन या जंगलात अधून मधून पट्टेदार वाघाचे दर्शन हे होते असते. वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये देखील अनेक वेळा पट्टेदार वाघाची छबी टिपण्यात यश आले आहे.
तीन छाव्यांसह सोन पिल्लांचे आगमन
१४ हजार एकर क्षेत्रात पसरलेल्या वढोदा वनपरिक्षेत्र पट्टेदार वाघाचे प्रजनन क्षेत्र बनले आहे. या गौरवावर २००२ साली शिक्कामोर्तब झाले. डोलारखेडा जवळ मरीमाता मंदिर लगत तीन छव्यांना वाघिणी ने जन्मास घातले होते. यानंतर आठ वर्षांपूर्वी सुकळी शिवारात नाना चव्हाण यांच्या शेतात ही वाघिणीने सोन पिल्लांना जन्म दिले होते या दोन्ही घटनेची नोंद वनविभागाकडे आहे.

Web Title: Tiger is still alive ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.