पोलिसांचा तंगडा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:33+5:302021-09-21T04:18:33+5:30
रात्री ११.३० वाजता शेवटचे विसर्जन गणेश घाटावर सकाळी ९ वाजल्यापासून गणपती विसर्जनाला सुरूवात झाली होती. रात्री ११.३० वाजता याठिकाणी ...
रात्री ११.३० वाजता शेवटचे विसर्जन
गणेश घाटावर सकाळी ९ वाजल्यापासून गणपती विसर्जनाला सुरूवात झाली होती. रात्री ११.३० वाजता याठिकाणी शेवटच्या बाप्पाचे विसर्जन झाले. बाप्पाच्या विसर्जनासाठी सार्वजनिक गणेश महामंडळ व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या स्वयंसवेकांची परिश्रम घेतले. तसेच ७० हजारांच्यावर घरगुती गणेश मूर्तींचे मेहरूण येथे विसर्जन झाले असल्याची माहिती सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी दिली.
पर्यावरण शाळेतर्फे ३०० मूर्तींचे संकलन
समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले. विसर्जनासाठी होणारी गर्दी व त्यातून कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता यंदा गणेशभक्तांना मेहरूण तलाव व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशास बंदी असल्यामुळे पर्यावरण शाळेतर्फे गणेशमूर्ती अर्पण आणि निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावेळी २५० - ३०० नागरिकांनीही घरापासून लांब न जाता गणेशमूर्ती आणि निर्माल्य केंद्रावर जाऊन अर्पण केले. शिव कॉलनी परिसरातील शारदाश्रम विद्यालय येथे हे संकलन केंद्र उभारण्यात आले होते.
काव्यरत्नावली चौकात २२२३ मूर्तींचे व ३ ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन
भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे रविवारी श्रीगणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. याठिकाणी २ हजार २२३ घरगुती व सार्वजनिक श्रीगणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. यासह ३ ट्रॅक्टर निर्माल्य संकलित करण्यात आले. सकाळी ७.१० वाजता पहिली मूर्ती संकलित करण्यात आली व रात्री ९.५५ वाजता शेवटची मूर्ती संकलित झाली. विशेष म्हणजे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील या ठिकाणी आपल्या घरगुती मूर्तीला केंद्रावर अर्पण केले. संकलित मूर्ती विधिवतपणे सजविलेल्या दोन ट्रक व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने मेहरूण तलाव येथे नेऊन विसर्जित करण्यात आल्या. सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू होता. यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, अमित जगताप, प्रीतम शिंदे, पियुष तिवारी, अर्जुन भारूळे, सयाजी जाधव, वेदांत दुसाने, संस्कृती नेवे, वैष्णवी भांडारकर, विनिता पाटील, दिनेश पाटील, वैष्णवी खैरनार, यश भालशंकर, अजय चव्हाण, तृषांत तिवारी, दीक्षांत जाधव, सागर सोनवणे, जयेश पवार, भूषण सोनवणे, तेजस श्रीश्रीमाळ, अमोल सोनवणे, भटू अग्रवाल, गोपाल पांडे, योगेश वानखेडे यांनी परिश्रम घेतले.