रेड झोन नको, तर लॉकडाऊन कडक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:07 PM2020-06-18T12:07:23+5:302020-06-18T12:07:38+5:30
मनपा प्रशासनावर दबाव : रुग्ण संख्येत वाढ
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या ३४८ इतकी झाली आहे. तसेच दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. शासनाकडून जाहीर झालेल्या झोन मध्ये जळगाव शहर रेडझोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात यावी यासाठी किमान १४ दिवस शहरात कडक लॉकडाऊन करण्यात यावा यासाठी मनपा प्रशासनावर दबाव वाढत आहे. नगरसेवकांसह व्यापाऱ्यांनी देखील शहरात १४ दिवस लॉकडाऊन करण्याची मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार नाही,+ तोवर शहरातील कोरोनारुग्णांची संख्या आटोक्यात येणार नाही असे मत नगरसेवक व व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे जळगाव शहर पाचव्या लॉकडाऊनमध्येही रेडझोनमध्ये कायम आहे. त्यामुळे शासनाने पाचव्या लॉकडाऊनमध्ये ज्याठिकाणी रेडझोन नाही अशा शहरांमध्ये व्यापाराला व सर्व प्रकारच्या व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जळगाव शहर रेडझोन मध्ये असल्याने शहरात मार्केटमधील दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही. तसेच स्थानिक स्तरावर दुकाने उघडण्याबाबत मनपा प्रशासनही शासनाच्या बाहेर जाण्यास तयार नाही. मात्र, शहरात मार्केटव्यतिरीक्त इतर व्यवसाय सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कायम आहे.
तर शहर रेडझोनमधून बाहेर येणारच नाही
एकीकडे शहरातील मार्केटवगळता इतर दुकाने सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढतच जाणार आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण देखील वाढत जातील व शहर रेडझोनमध्येच कायम राहिल. शासनाच्या आदेशाप्रमाणे शहर रेडझोनमध्ये राहिंल्यास त्याठिकाणी मार्केटमधील दुकाने व मॉल्स उघडू शकत नाहीत. त्यापेक्षा प्रशासनाने काही दिवस लॉकडाऊन पाचमध्ये आणलेली शिथिलता कमी करून १४ दिवस कडक लॉकडाऊन पाडण्यात यावा अशी मागणी मंगळवारी फुले मार्केटसह इतर मार्केटमधील व्यापाºयांनी केली. कडक लॉकडाऊन पाडण्यात आला तर निदान कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण येईल. त्यामुळे शहर रेडझोनमधून बाहेर येवून व्यापाराला पोषक वातावरण निर्माण होईल असे मत व्यापाºयांनी व्यक्त केले.