३१ आॅक्टोबर पर्यंत होणार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील आराखड्यांची छाननी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 09:24 PM2017-10-13T21:24:34+5:302017-10-14T17:25:02+5:30
विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहद् आराखड्यांची छाननी आणि पूर्नतपासणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीकडून ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या बृहद् आराखड्यांची छाननी करण्यात येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१३-विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहद् आराखड्यांची छाननी आणि पूर्नतपासणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीकडून ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या बृहद् आराखड्यांची छाननी करण्यात येणार आहे. छाननीनंतर समितीकडून संबधित विद्यापीठाच्या आराखड्यांमधील काही बदल असल्यास समितीकडून ते सूचविले जाणार आहेत.
शुक्रवारी छाननी समितीची पहिली बैठक औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात समिती अध्यक्ष डॉ.के.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत शिक्षण तज्ज्ञ अनिल राव, डॉ.विठ्ठलराव घुगे, डॉ.एन.जे.पवार, प्रा.मिलिंद सोहनी, डॉ.बी.एन.जगताप, डॉ.योगानंद काळे, राम भोगले, डॉ.धनराज माने व सिध्दार्थ खरात आदी उपस्थित होते.
राज्यातील सर्व विद्यापीठांना भेटी देतील समिती सदस्य
राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपले वार्षिक व पंचवार्षिक बृहद् आराखडे तयार केले आहेत. या आराखड्यांची छाननी समितीच्या सदस्यांकडून केली जाणार आहेत. त्यामुळे ३१ आॅक्टोबर पर्यंत समितीच्या सदस्यांकडून सर्व अकृषी विद्यापीठांना भेटी दिल्या जाणार आहेत. या दरम्यान आराखडा तयार करताना विद्यापीठांनी ठरविलेले निकष, त्यांचे उदिष्ट याबाबतची माहिती जाणून घेतली जाणार आहे. या छाननीअंती समितीला विद्यापीठांच्या आराखड्यांमध्ये काही बदल करण्याचा सूचना देखील दिल्या जावू शकतात. यासाठी समिती सदस्यांची ३१ आॅक्टोबर व १ नोव्हेंबर बैठक होणार आहे. या बैठकीत समिती सदस्यांकडून आराखड्यांमधील सूचविलेले बदल सांगण्यात येतील.