यावलच्या लाचखोर वनसंरक्षकाला बुरे दिन!
By admin | Published: May 27, 2017 01:13 AM2017-05-27T01:13:37+5:302017-05-27T01:13:37+5:30
१ लाख ८२ हजारांची लाच घेताना पकडले : शासकीय निधीतून चार टक्क्यांप्रमाणे मागितली लाच
जळगाव : शासकीय कामांसाठी मिळालेल्या मंजूर निधीतून तक्रारदार वनपरिक्षेत्र अधिकाºयांकडून निधीच्या चार टक्क्यांप्रमाणे मोबदल्याची मागणी करून त्यापोटी १ लाख ८२ हजारांची लाच स्वीकारताना यावल वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सूर्यकांत चावदस नाले (वय- ५७, रा़ भूषण कॉलनी, जळगाव) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावल वनविभागाच्या कार्यालयात रंगेहाथ पकडले़ तक्रारदार हे यावल वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहे़
५० ते ५५ लाखांच्या निधीतून तक्रारदार अधिकाºयाने केलेल्या शासकीय कामांच्या रकमेपोटी ४ टक्केप्रमाणे १ लाख ८२ हजार रुपयांच्या मोबदल्याची मागणी नाले यांनी केली होती़
धुळे एसीबीच्या पथकाने जळगाव येथील यावल वनविभागाच्या कार्यालयात सायंकाळी नाले यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.सहायक वनसंरक्षक नाले यांच्या भूषण कॉलनीतील घरात झडती सुरू होती़