सामाजिक संघटनांनी पाठ फिरविल्याने यंदा जळगाव येथील कारागृहातील कैद्यांच्या दिवाळी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 07:06 PM2017-10-19T19:06:09+5:302017-10-19T19:09:44+5:30
सामाजिक संघटनांनी पाठ फिरवल्यामुळे यंदा कारागृहातील कैद्यांची दिवाळी अंधारातच गेली. एकाही सामाजिक संघटनेने कैद्यांसाठी फराळ किंवा मिठाई आणली नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र गुरुवारी सकाळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारागृहात जाऊन कैद्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी त्यांच्याहस्ते कैद्यांना चिवडा वाटप करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१९ सामाजिक संघटनांनी पाठ फिरवल्यामुळे यंदा कारागृहातील कैद्यांची दिवाळी अंधारातच गेली. एकाही सामाजिक संघटनेने कैद्यांसाठी फराळ किंवा मिठाई आणली नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र गुरुवारी सकाळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारागृहात जाऊन कैद्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी त्यांच्याहस्ते कैद्यांना चिवडा वाटप करण्यात आला. शहर व परिसरातील सामाजिक संघटनांतर्फे प्रत्येक सण कारागृहात साजरा केला जातो. दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी सणात आपण कुटुंबापासून लांब असल्याचे शल्य कैद्यांना बोचत आहे. सर्वत्र सणासुदीचा उत्साह, जल्लोष असताना कैदी मात्र या आनंदापासून लांब आहे. हीच बाब हेरुन सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील गुरुवारी सकाळी ११ वाजता कारागृहात पोहचले. त्यांनी महिला व पुरुष कैद्यांशी संवाद साधला, कैद्यांना शुभेच्छा दिल्या.
कैद्यांना गहिवरुन आले
कारागृहात असलेली प्रत्येक व्यक्ती ही संशयित आहे. त्यांच्यावर गुन्हा सिध्द व्हायचा आहे. आज तो घर व समाजापासून तुटला आहे.कायदा आपले काम करीत आहे, त्यासाठी आपणही कायद्याचा मान राखला पाहिजे असे गुलाबराव पाटील सांगत असताना अनेक कैद्यांना गहिवरुन आले. दिवाळी सारख्या सणात आपण कुटुंबासोबत नसल्याचे नैराश्य कैद्यांच्या चेहºयावर जाणवत होते. कोणाला काही आजारपण असेल तर वैद्यकिय सुविधा पुरविण्याचे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिले.
आज दिवाळी पहाट
आई सावित्रीमाई फुले बहुद्देशिय संस्था, आॅर्डनन्स फॅक्टरी वरणगाव यांच्यामार्फत पाडव्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी आठ वाजता कारागृहात दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक कुवर सुनील यांनी दिली.