आमदार, खासदारांनी घालविला कुंटूंबियांसोबत वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:56 AM2020-03-23T11:56:27+5:302020-03-23T11:56:45+5:30
जळगाव : नेहमी नागरिकांच्या गर्दीत असणारे लोकप्रतिनिधींनी ‘जनता कर्फ्यू’ च्या निमित्ताने रविवार आपल्या कुंटूंबियांसोबत घालविला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह ...
जळगाव : नेहमी नागरिकांच्या गर्दीत असणारे लोकप्रतिनिधींनी ‘जनता कर्फ्यू’ च्या निमित्ताने रविवार आपल्या कुंटूंबियांसोबत घालविला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे व इतर आमदारांनी संपुर्ण दिवस कुंटूंबियांसोबत घालत काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सकाळपासून पाळधी येथील आपल्या निवासस्थानीच दिवसभर थांबून होते. जेवण केल्यानंतर काही वेळ आपल्या शेतात फेरफटका मारला त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या कुंटूंबियांमध्येच वेळ घालविला. यावेळी अनेक जुन्या गोष्टींवर चर्चा झाल्या. नागरिकांशी नेहमी संपर्क ठेवण्यात कुंटूंबियांशी व्यवस्थित संपर्क होवू शकत नाही. मात्र, देशावर ‘कोरोना’ ची आपत्ती ओढावली असल्याने या आपत्तीतून का असेना कुंटूंबियांसोबत वेळ काढण्याची संधी मिळाली असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
खासदार उन्मेष पाटील
जनता कर्फ्यूमध्ये आज दिवसभर कुटुंबासोबत वेळ घालविला. सर्वांसोबत गप्पागोष्टी, विविध खेळांचा आनंद घेतला. सोबत वाचनही केले. अनेक दिवसांनंतर सर्व जण एकत्र आल्याने मोठा आनंद घरात होता. संध्याकाळी पाच वाजताच टाळ््या वाजविण्यासह थालीनाद केला, असे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.
गिेरीश महाजन
माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील दिवसभर घरीच थांबून होते. दुपारच्या वेळेस वाचन केले. काही वेळ कुंटूंबियांसोबतच वेळ घालविला. सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कुंटूंबियांसोबत घंटानाद केला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन सोबत चर्चा केली.
आमदार सुरेश भोळे
आमदार सुरेश भोळे हेदेखील सकाळपासून निवासस्थानी थांबून होते. काही वेळ कुटुंबियांसोबत घालविल्यानंतर दुपारच्या वेळेस युट्यूबवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणांचे व्हिडीओ पाहिले.