रावेर तालुक्यात पाण्याअभावी केळीची खोडे उपटून फेकण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 08:26 PM2018-12-12T20:26:18+5:302018-12-12T20:27:06+5:30
उटखेडा, ता. रावेर , जि.जळगाव : पाणी उपलब्ध नसल्याने केळीची खोडे उपटून केळी बागा कापून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली ...
उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : पाणी उपलब्ध नसल्याने केळीची खोडे उपटून केळी बागा कापून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
उटखेडासह परिसरात पूर्वी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असायचे. मोठ्या प्रमाणात केळीचे लागवड केली जात असे. पण तीन-चार वर्षापासून पावसाळा कमी प्रमाणात झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विहीर, बोअर, नद्या कोरडे राहिल्या. यामुळे उटखेडा परिसरातील बागायती शेती संकटात सापडला आहे.
गेल्या १० महिन्यांपासून लेकराप्रमाणे सांभाळलेली केळी पाण्याअभावी कापण्यात आली आहे. शेतकºयांच्या डोळयातही दुष्काळाने पाणी आणले असून शेतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. केळी हे पीक संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. तालुक्यात व परिसरात पाणी मुबलक असाल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जात असे. पण या वर्षात पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने केळी बागा धोक्यात आल्या आहेत.
१० महिने सांभाळून दोन महिने शिल्लक राहिले असता पाण्याअभावी केळी कापून टाकण्यात येत आहे. केळी तिसवली होती. १० ते १२ पर्यंत केळीच्या फण्या टाकल्या होत्या. केळीसाठी भरपूर प्रमाणात खर्च करण्यात आला. केळीचे रोप, ठिबक, खत, फवारणी इत्यादींचा खर्च करण्यात आला होता. शेतकºयांनी स्वत: धडपड करून केळीच्या बागा जगविण्याचा प्रयत्न केला. पण आता खिशातलेही पैसे खर्च करून शेतकरी मोकळा झाला आहे. केळीच्या बागा कापताना काळजावर वार केल्याच्या वेदना झाल्या, अशा भावना शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत.