मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:53 PM2018-12-07T16:53:43+5:302018-12-07T16:55:22+5:30
हरताळे, ता. मुक्ताईनगर , जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी ...
हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी झपाट्याने खालावत आहे. अपूर्ण पाण्यामुळे लागवडीनंतर काही महिन्यातच केळी लागवड केलेली असता उपटून फेकण्याचे अस्मानी संकट येऊन केळीबाग फेकावी लागल्याने खरीप हंगामासह रब्बीलाही मुकावे लागले आहे.
अगोदरच केळी लागवडीसाठी शेतकरी धजावत नव्हता. उशिराने कशी बशी लागवड केली. त्यामुळे मध्येच कूपनलिका व विहिरीचे पाणी अचानक कमी झाल्याने लावलेल्या केळीची मेहनतही वाया गेली व खर्चही वाया गेला आहे. त्यातच खरिपाच्या हगमलाही मुकावे लागले आहे.
पुरेशा पाण्याअभावी केळी फेकावी लागत आहे
परिसरात विहीर खोदकाम नवीन ट्यूूबवेळ करण्यासाठी शेतकरी पैसा खर्च करून केवळ नशीब आजमावत आहे. पण पाण्याचा थेंबही लागत नसल्याने पदरी निराशाच पडत आहे. उभे आडवे बोअरवेल करूनसुद्धा लक्षणीय घट दिसून येत आहे. दरवर्षी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पुरेपूर पाण्याची विहीर सापडणे कठीण झाले आहे. एप्रिल-मे महिन्यात जे श्रम करावे लागतात, ते आतापासूनच करावे लागत आहे. कांदे बागांची लागवडीत लक्षणीय घट झाली आहे.
लाख मोलाची केळी गुरांच्या घशात
पावसाळ्यात लावलेली केळी उन्हाळ्यात फेकण्याची वेळ येते. ही वेळ हिवाळ्यातच अली आहे. सुकलेली केळी गुरांच्या घशात जात आहे. दरवर्षी असा आर्थिक फटका बसत आहे. कायमस्वरूपी जलसिंचन सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे