अंत्ययात्रेसाठी आलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:11+5:302021-06-30T04:12:11+5:30

बिडगाव, ता. चोपडा : मयतावर अंतिम संस्कार करण्यासाठी आलेल्या महिलांवरच काळाने घाव घातला. ओट्यावर बसलेल्या असताना भिंत कोसळून एक ...

Time wounds on tribal women who came for funeral | अंत्ययात्रेसाठी आलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घाव

अंत्ययात्रेसाठी आलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घाव

Next

बिडगाव, ता. चोपडा : मयतावर अंतिम संस्कार करण्यासाठी आलेल्या महिलांवरच काळाने घाव घातला. ओट्यावर बसलेल्या असताना भिंत कोसळून एक आदिवासी महिला ठार तर सहा महिला जखमी झाल्याची घटना वरगव्हाण येथे घडली.

पुरुष मंडळी प्रेत घेऊन स्मशानभूमीत गेले. समाज प्रथेप्रमाणे सर्व महिला गावहाळ जवळ हातपाय धुण्यासाठी गेल्या असताना शेजारीच असलेल्या एका बांधकामाच्या ओट्यावर काही महिला बसल्या. क्रूर काळाने या गरीब आदिवासी महिलांवर आपला डाव साधत ओट्यासह भिंत कोसळली. यात एक महिला जागीच ठार झाली तर तब्बल सहा महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना काल वरगव्हाण येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली..

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे रामा रतन पावरा यांची सून उषाबाई विजय पावरा यांचे निधन झाले होते. त्यामुळे नातेवाईक व आप्तेष्ट अंत्यसंस्कारासाठी जमलेले होते. मयत महिलेचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी पुरुष मंडळी घेऊन गेले होते. इकडे सर्व महिला समाज प्रथेप्रमाणे संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गावहाळवर गेल्या व काही महिला शेजारीच बांधकाम सुरू असलेल्या भिकन दमड्या पावरा यांच्या ओट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी अचानक ओट्यासह घराची भिंत पडली व क्षणात होत्याचे नव्हते झाले. यात जेलीबाई परशुराम बारेला ही अपंग महिला जागीच ठार झाली तर त्यांच्यासोबत लालबाई मारसिंग पावरा, कुसुमबाई नरसिंग पावरा, कालूबाई प्रताप बारेला, बाकलीबाई भाईदास पावरा, जसूबाई शेवा पावरा, सायकाबाई भायला पावरा या गंभीर जखमी झाल्या.

घटना घडली तेव्हा सर्व पुरुष प्रेतयात्रेत गेले होते. मात्र गावाचे सरपंच भूषण पाटील यांनी स्वतःच्या गाडीत टाकत धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. आरोग्य सेविका भिकूबाई बोदडे व भारती सोनवणे यांनी उपचार करत जखमींना उपचारासाठी जळगाव रवाना करण्यात आले आहे.

याठिकाणी पं. स.चे उपसभापती सूर्यकांत खैरनार यांनी भेट दिली तर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, तलाठी सरोवर तडवी घटनास्थळी भेट दिली तर अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनीही आपले सहकारी पाठवत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले.

Web Title: Time wounds on tribal women who came for funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.