खरे बोलणारेही राजकारण करु शकतात, हे सिद्ध करायचंय : छत्रपती संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 07:23 AM2023-05-30T07:23:39+5:302023-05-30T07:24:09+5:30

‘स्वराज्य’ आता सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी सुसंस्कृत माणसे वेचणार आहे, संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य

To prove that even those who speak the truth can do politics Chhatrapati Sambhaji Raje | खरे बोलणारेही राजकारण करु शकतात, हे सिद्ध करायचंय : छत्रपती संभाजीराजे

खरे बोलणारेही राजकारण करु शकतात, हे सिद्ध करायचंय : छत्रपती संभाजीराजे

googlenewsNext

जळगाव : भाजप-शिवसेना की महाविकास आघाडी हा आताचा विषय नाहीच. आमचा अजेंडा ‘स्वराज्या’चा आहे. आमची ‘स्वराज्य’ संघटना स्वतंत्र आहे. स्वतंत्रच पुढे जाणार. मात्र २०२४ मध्ये जर कुणी प्रस्ताव दिला तर जायचे किंवा नाही, हा पहिला प्रश्न असेल. जायचं म्हणून ठरलं तर समविचारी संघटनांनाच प्राधान्य देऊ, असे मत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येथे व्यक्त केले.

रविवारी रात्री जळगाव येथे झालेल्या प्रकट मुलाखतीत बोलत होते. राज्यातील आणि देशातील ‘वंचित’पणा घालवला तर आरक्षणाचा मुद्दाही निकाली निघेल. त्यासाठी सर्वच नेत्यांना एक व्हावे लागेल. दुर्देवाने सध्या नेते संकुचित वृत्ती जोपासण्यात आणि राजकारणातच व्यस्त आहेत. त्यामुळे ‘स्वराज्य’ आता सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी सुसंस्कृत माणसे वेचणार आहे. त्या माध्यमातून खरे बोलणारेही राजकारण करु शकतात, हे सिद्ध करायचे आहे. बहुजनांचे राज्य जिवंत करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

२०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी खासदारकीची संधी दिली. तेव्हा मात्र मी अटी घातल्या होत्या. भाजपचा प्रचार करणार नाही, दुपट्टाही घालणार नाही. टर्म संपली. मात्र गडकिल्ल्यांसाठी अपूर्व कामगिरी करता आली. 

Web Title: To prove that even those who speak the truth can do politics Chhatrapati Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.