जीवनाश्यक वस्तू वगळता इतर व्यवहार पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 07:26 PM2020-05-09T19:26:26+5:302020-05-09T19:42:20+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जळगाव, भुसावळ, अमळनेर, पाचोरा, चोपडा येथे उपाययोजना

  From today, all transactions except essentials will be closed again | जीवनाश्यक वस्तू वगळता इतर व्यवहार पुन्हा बंद

जीवनाश्यक वस्तू वगळता इतर व्यवहार पुन्हा बंद

Next

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर तातडीने उपाय योजना म्हणून जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर व चोपडा या शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर व्यवहार रविवार, १० मे पासून लॉकडाउन संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी दिले.
जिल्ह्यातील काही शहरांमध्ये लॉकडाउनच्या काळात नागरिक, लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. ते जनता कर्फ्युचे पालन करु शकतात, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आदींची उपस्थिती होती़

नियत्रंण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती
जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्क्रिनींग वाढविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्येही संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार झाल्याने त्यांच्यापासून होणारा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. याकरीता जिल्ह्यातील कंटेंन्मेंट क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला त्या क्षेत्राबाहेर जाता अथवा येता येणार नाही. या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण अधिकाºयांची नेमणुका कराव्यात तसेच या भागातील नियंत्रणासाठी स्थानिकांची मदत घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या़

इंधनासाठीही बंधने
वरील पाचही शहरांमध्ये पेट्रोलपंपांच्याही वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेतच पेट्रोलपंप सुरू राहतील, असेही आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिले आहे. मात्र महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्राबाहेरील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावरील पेट्रोलपंपांना वेळेचे बंधन राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

प्रतिबंधीत क्षेत्रात विशेष लक्ष
कण्टेंमेंट क्षेत्रातील कोणीही व्यक्ती लॉकडाऊन संपेपर्यंत कुठल्याही सार्वजनिक आस्थापनेत कामावर येणार नाही याची खबरदारी संबंधित आस्थापनांनी घ्यावी. त्या क्षेत्रातील ज्या नागरीकांना उच्च रक्तदाब, डायबेटिस व इतर आजार असतील व त्यांना तातडीने उपचार, औषधे घेणे, तपासणी करणे आवश्यक असेल तर अशा नागरिकांसाठी नियंत्रण अधिकारी सूचनेनुसार वाहन व्यवस्था करावीत़ तसेच कोविड केअर सेंटरवर नियंत्रण ठेवण्यासाठीही अधिकाºयांच्या नेमणुका करण्यात येतील, अशीही माहिती देण्यात आली.

आरोग्य सुविधांचे वर्गीकरण
जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील दवाखान्यांना आवश्यक बाबींसाठी आयुक्त सतीश कुलकर्णी तर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र्रांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील हे नियंत्रक अधिकारी राहतील. या दवाखान्यांमध्ये रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफची नियुक्ती करणे, या रुगणालयांमध्ये लागणारी औषधे व उपचार साधने पुरविणे, कोरोना योद्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार या अधिकाºयांना देण्यात येतील. तसेच प्रत्येक कोविड केअर सेंटरला आयुर्वेदिक डॉक्टारांची नेमणूक करण्याची सूचनाही जिल्हाधिकाºयांनी सर्व संबंधितांना दिल्या़

विद्यार्थ्यांसाठी सुविधा
लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. शैक्षणिक कारणासाठी जिल्ह्यात लॉकडाउनमुळे पुण्याचे जे विद्यार्थी अडकलेले असतील त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी फक्त विद्यार्थ्यांनीच प्रांताधिकारी दीपमाला चौरे व उपजिल्हाधिकारी किरण सावंत यांच्या मोबाईल क्रमांकावर आपले नाव, शिक्षण संस्थेचे नाव व जाण्याचे ठिकाण याबाबतचा संदेश पाठवावा. तसेच भुसावळ येथून लखनौला जाण्यासाठी ट्रेन रवाना करण्यात आली आहे. त्याचधर्तीवर बिहार व पश्चिम बंगालसाठी रेल्वेचे नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

दुकानावर एका वेळी एकच व्यक्तीला परवानगी
लॉकडाउनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानात काऊंटरवर एकावेळी एकच व्यक्ती असावा. ज्या दुकानात या नियमांचे पालन होणार नाही त्यांच्या दुकानाचा परवाना लॉकडाऊन संपेपर्यंत निलंबित करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी यावेळी दिला.

 

Web Title:   From today, all transactions except essentials will be closed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.