अकरावी प्रवेश अर्जाचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:22 AM2021-08-24T04:22:24+5:302021-08-24T04:22:24+5:30

जळगाव : अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये शुक्रवारपासून मेरीट अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने ...

Today is the last day of the eleventh admission application | अकरावी प्रवेश अर्जाचा आज शेवटचा दिवस

अकरावी प्रवेश अर्जाचा आज शेवटचा दिवस

Next

जळगाव : अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये शुक्रवारपासून मेरीट अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून मंगळवारी अर्ज करण्याची मुदत संपणार आहे. आतापर्यंत ३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. तर यंदा विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असल्याचे पाहायला मिळत आहे.

शिक्षण विभागातर्फे काही दिवसांपूर्वी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले गेले होते. त्यानुसार शुक्रवार, २० ऑगस्टपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना अर्ज करताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रवेश मिळावा यासाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक अर्ज विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. मुळजी जेठा महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत ३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. मंगळवारी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतरच वेळापत्रकानुसार २७ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.

कला शाखेत थेट प्रवेश

शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी मेरीट लागणार आहे. काहींनी कला शाखेला मेरीट न ठेवता थेट प्रवेश दिले आहेत. मात्र, विज्ञान व वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्यामुळे मेरीटसाठी चढाओढ पहायला मिळणार आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे याठिकाणी सर्वाधिक प्रवेशासाठी स्पर्धा असेल.

आवश्यक कागदपत्रे

लिव्हिंग सर्टिफिकेट, दहावीचे मूळ गुणपत्रक, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती, एक फोटो लागणार. अर्ज बिनचूक भरणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशप्रक्रिया मेरीटनुसार राबवली जाणार आहे. यामुळे एका विद्यार्थ्यास एकापेक्षा अधिक शाखांसाठी प्रवेश अर्ज भरता येणार आहे. यासह एकापेक्षा अधिक महाविद्यालयांत अर्ज दाखल करता येणार आहे. मेरीट यादी एकाच दिवशी जाहीर होणार असल्याने एका महाविद्यालयात नंबर न लागल्यास विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार महाविद्यालय निवडण्याची संधीही मिळणार आहे.

०००००००००००००००००००००००

२३ ऑगस्टपर्यंतची स्थिती

- मूळजी जेठा महाविद्यालय

शाखा जागा आतापर्यंत आलेले अर्ज

विज्ञान : ९६० : ११००

वाणिज्य : ७२० : ६७५

कला : २४० : ९०

००००००००००००००००००००००

धनाजी नाना महाविद्यालय

शाखा जागा आतापर्यंत आलेले अर्ज

विज्ञान : २४० : २६५

०००००००००००००००००००००००

ॲड.बबनभाऊ बाहेती महाविद्यालय

शाखा जागा आतापर्यंत आलेले अर्ज

विज्ञान : १२० : २११

वाणिज्य : २०० : २३५

कला : १८० : ३३

०००००००००००००००००००००००

अण्णासाहेब जी़ डी़ बेंडाळे महिला महाविद्यालय

शाखा जागा आतापर्यंत आलेले अर्ज

विज्ञान : २४० : २९०

वाणिज्य : ३६० : २७५

कला : २४० : ६०

०००००००००००००००००००००००

नूतन मराठा महाविद्यालय

शाखा जागा आतापर्यंत आलेले अर्ज

विज्ञान : ४२० : ३६५

वाणिज्य : ३२० : १६४

कला : ४२० : १३०

Web Title: Today is the last day of the eleventh admission application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.