अमळनेरात आज संत सखाराम महाराज रथोत्सव

By Admin | Published: May 6, 2017 12:56 AM2017-05-06T00:56:00+5:302017-05-06T00:56:00+5:30

अमळनेर : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणा:या श्रीक्षेत्र अमळनेरात शनिवार, 6 मे रोजी श्रीसंत सखाराम महाराजांचा रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Today, Saint Sakharam Maharaj Rathotsav | अमळनेरात आज संत सखाराम महाराज रथोत्सव

अमळनेरात आज संत सखाराम महाराज रथोत्सव

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणा:या श्रीक्षेत्र अमळनेरात शनिवार, 6 मे रोजी  श्रीसंत सखाराम महाराजांचा रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता वाडी संस्थानपासून रथ मिरवणुकीस प्रारंभ                     होईल.
दुस:या दिवशी पहाटेर्पयत सोहळा
शहराचे धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा दुस:या दिवशी पहाटेर्पयत सुरू असतो. सुमारे 200 वर्षापासून सुरू असलेली ही  परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू आहे.
मोहिनी एकादशीच्या दिवशी  मुहूर्त बघून सायंकाळी रथ मार्गस्थ होत असतो.
रथावर श्री लालजींची हातात धनुष्यबाण घेतलेली चांदीची मूर्ती स्थापन करण्यात येते. रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला आहे.
रथ बोरी नदीच्या पुलावर आल्यावर नदीपात्रात नयनरम्य आतषबाजी करण्यात येते.
या रथोत्सवात सर्व समाजातील नागरिक सहभागी होत असतात. या उत्सवातून एकात्मतेचे दर्शन घडत असते.

Web Title: Today, Saint Sakharam Maharaj Rathotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.