आज स्वाक्षरी मोहीम, तर उद्या मनपासमोर आंदोलन
By admin | Published: April 28, 2017 01:01 AM2017-04-28T01:01:18+5:302017-04-28T01:01:18+5:30
रस्त्यांची मालकी बदलास विरोध : जळगाव फस्र्टच्या नेतृत्वाखाली 15 सामाजिक संस्था एकवटल्या
जळगाव : राज्य शासनाने शहरातील सहा रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगाव फस्र्ट या संस्थेच्या माध्यमातून शुक्रवार, 28 एप्रिल रोजी शहरातील 15 सामाजिक संस्थांच्या सहकार्याने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
त्यानंतर जनमताची माहिती 29 रोजी होणा:या महापालिकेच्या महासभेत महापौर नितीन लढ्ढा यांना देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, 29 रोजी मनपासमोर शहर बचाव सर्वपक्षीय समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्यमार्गाच्या 500 मीटर परिसरातील दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशातून पळवाट काढण्यासाठी शहरालगतच्या राष्ट्रीय व राज्यमार्गासह सहा रस्ते महापालिकेकडे हस्तांतरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय जनहिताचा नसून दारू दुकाने व बांधकाम व्यावसायिकांना फायदा मिळावा यासाठी घेतला आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या जळगाव महापालिकेला विकासकामांसाठी निधी नाही, तर या रस्त्यांची जबाबदारी मनपाला कशी पेलवेल यासह विविध दुरगामी परिणाम रस्ते हस्तांतरणाच्या निर्णयामुळे होणार असल्याने या निर्णयाला शहरातून मोठा विरोध होऊ लागला आहे.
याचाच एक भाग म्हणून विरोधाचे हे आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी व त्यात जनतेचा सहभाग वाढावा म्हणून ‘जळगाव फस्र्ट’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली राजकीय पक्षविरहित व विविध संघटनांचा सहभाग घेऊन आंदोलन उभे करण्यासाठी जळगाव फस्र्टचे प्रणेते डॉ.राधेश्याम चौधरी यांनी गुरुवारी बैठकीचे आयोजन केले होते.
विविध संघटना पदाधिका:यांचा सहभाग
रस्त्यांबाबत झालेल्या निर्णयाविरोधात जनमत एकवटण्यासंदर्भात झालेल्या चर्चेत विविध संघटना पदाधिका:यांचा सहभाग होता. यात जिल्हा महिला संघटनेच्या वासंती दिघे, राजकमल पाटील, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, विनोद देशमुख, नितीन पाटील यांच्यासह पत्रकार दिलीप तिवारी तसेच अनिल नाटेकर, याकूबखान मुलतानी, अशफाक पिंजारी, वासुदेव राणे, डी. डी. वाणी, शिवराम पाटील, अद्वैत दंडवते, सलीम इनामदार, गुरुनाथ सैंदाणे, रागीब अहमद, जमील शेख, राजेंद्र महाजन, विवेक पाटील, नितीन पाटील, हर्षल राजपूत, निखिल राजपूत, नितीन विसपुते, डॉ. विकास निकम, सतीश वाणी आदींची उपस्थिती होती.
या भागात लावले जाणार स्टॉल
गणेश कॉलनी, महापालिकेसमोर, मशिदीच्या बाहेर, अजिंठा चौक, अयोध्यानगर, सद्गुरूनगर, गुजराल पेट्रोल पंप परिसर, शनिपेठेतील सोनाळकर कॉम्प्लेक्ससमोर, काव्यर}ावली चौक, पांडे डेअरी चौक, पंचमुखी हनुमान परिसर, स्टेडियम परिसर, कोर्ट चौक यासह शहरातील विविध भागात स्टॉल लावून नागरिकांच्या स्वाक्ष:या घेतल्या जाणार आहेत. 15 सामाजिक संस्था या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती डॉ.चौधरी यांनी दिली.
10 हजार स्वाक्ष:यांचे निवेदन
शहरातील विविध संघटना प्रतिनिधी, कार्यकत्र्यानी आपापल्या भागात स्टॉल लावून व घरोघरी संपर्क साधून कमीत कमी 10 हजार किंवा त्यापेक्षा अधिक स्वाक्ष:या घ्याव्यात व या स्वाक्ष:यांचे निवेदन 29 रोजी होणा:या महासभेत महापौर, आयुक्तांना दिले जावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दारू हटाव, शहर बचाव
विकासासाठी निधी नसताना 15 वर्षापूर्वीच्या ठरावाचा आधार घेत 45 दारू दुकाने वाचविण्यासाठी शहरातील 6 रस्त्यांची मालकी बदलविण्यात आली. लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मनपासमोर ‘दारू हटाव, शहर बचाव’ असे आंदोलन करण्यात येणार आहे. सहभागाचे आवाहन शहर बचाव सर्वपक्षीय समितीने केले आहे.