नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांचे आज प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:36 AM2021-01-13T04:36:59+5:302021-01-13T04:36:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - राज्य शासनाने बांधकाम नियमावलीत बदल केला असून, मंजुर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - राज्य शासनाने बांधकाम नियमावलीत बदल केला असून, मंजुर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संबधित बदलाबाबत राज्यातील नगररचना विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. यानुसार सोमवारी नाशिक विभागातंर्गत येणाऱ्या महानगरपालिकेतील नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांच्या शिबीराचे आयोजन सोमवारी नाशिक येथे करण्यात आले आहे. यामध्ये मनपा नगररचना विभागातील प्रमुख ५ रचना सहाय्यक देखील सहभागी होणार आहेत. मुख्य अभियंते या शिबिरात सहभागी होणार असल्याने नगररचना विभागातील कामकाजावर परिणाम होणार असून, सोमवारी आवक-जावक रजिस्टर नोंदणीचे काम सुरु राहणार आहे. यासह मनपा आयुक्त व सहाय्यक नगररचनाकारांकडील फाईलींन मंजुरी मिळणे हे देखील काम सुरु राहणार आहे. नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून नगररचना विभागात इतर कामे बंद राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मंगळवारी आपली कामे दाखल करावीत असे आवाहन नगररचना विभागाकडून करण्यात आले आहे.