आज साध्या पध्दतीने होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:14+5:302021-05-14T04:16:14+5:30

आरतीचे फोटो पाठविण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव भव्य दिव्य शोभायात्रा ...

Today will be simple | आज साध्या पध्दतीने होणार

आज साध्या पध्दतीने होणार

Next

आरतीचे फोटो पाठविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव भव्य दिव्य शोभायात्रा काढून मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र, गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे शुक्रवारी केवळ दोन व्यक्तींच्या उपस्थितीत भगवान श्री परशुरामांच्या पारंपरिक मूर्तीचे अभिषेक व आरती करून साध्या पध्दतीने जयंती साजरी केली जाणार आहे.

समाज बांधवांनी आपल्या कुटुंबासमवेत घरात राहून भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्‍याचे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अशोक वाघ यांनी केले आहे. तसेच शुक्रवारी सायंकाळी ७.१५ वाजता शंख, डमरू, झांझ, थाळी वाजवून पूजन-आरती करून भगवान परशुरामांचा जन्मोत्सव साजरा करावा. तसेच घरासमोर दिवे लावावे, रांगोळी काढावी व ओम जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम: प्रचोदयात् या मंत्राचा जप करावा व भगवान विष्णूंचा सहावा अवतार असल्याने विश्वशांतीसाठी श्री विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र पठण करावे, असेही आवाहन करण्‍यात आले आहे. केलेल्या पूजन आरतीचे व घरातच राहून ब्राह्मण एकता दिवस साजरा केल्याचे छायाचित्र बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या व्हाॅट्स ॲप ग्रुपवर पाठविण्याचे देखील कळविण्यात आले आहे.

------

आरती, फोटो सजावट स्पर्धा

सुरभीतर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त आरती, सजावट फोटो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. समाजबांधवांनी घरातच राहून उत्सव साजरा करावा, असे आवाहन अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांनी केले आहे. शुक्रवारी परशुरामांचा फोटो किंवा मूर्ती पूजन घरीच राहून करायचे आहे. पूजा किंवा आरती करतांना फोटो काढून सुरभीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवायचा आहे. यात महिलांनी लाल/हिरव्या रंगाची साडी तर पुरुषांनी पिवळ्या/केशरी रंगाचा कुर्ता परिधान करावा, कुटुंबासोबत आरती/पूजा करतांना सेल्फी/फोटो काढावा, फोटोमध्ये भगवान परशुरामांचा फोटो/मूर्ती आवश्यक असावी, साधारण पारंपरिक वेशभूषेतील फोटो रविवारपर्यंत व्हॉट्सॲप ग्रुपवरच पाठवावे, असे आवाहन अध्यक्ष स्वाती कुळकर्णी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

--------

रक्तदान शिबिर

भगवान परशुराम जयंतीनिमित्ताने १४ मे रोजी सकाळी ८ ते १२ दरम्यान बळीराम पेठेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर महर्षी श्रृंगऋषी (सिखवल ब्राह्मण समाज) बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश जोशी, उपाध्यक्ष रविशंकर पांडे, सचिव निखिल शर्मा यांनी केले आहे.

Web Title: Today will be simple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.