एकत्र आलो, भेट झाली म्हणजे आमचा ‘फ्रेंडशीप डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:37 PM2017-08-06T12:37:27+5:302017-08-06T12:38:39+5:30
मैत्री आमची : देशभरात नावलौकिक मिळविणा:या तनय मल्हारा व अभिनेत्री सुरभी हांडे यांच्याकडे मैत्रीचीही श्रीमंती
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 6 - नृत्य व योगामुळे देशाच्या नकाशावर जळगावचे नाव झळकविणारा तनय मल्हारा हा खूप मेहनती आहे. तर जय मल्हार मालिकेतील म्हाळसाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभी हांडे ही मनात कोणताही किंतु,परंतु न ठेवता प्रत्येकाच्या बाबतीत मदतीची भावना ठेवण्याचा स्वभाव आहे. राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेले असे मित्र व मैत्रिण लाभल्याचा मला अभिमान असल्याचे तनय मल्हारा व सुरभी हांडे यांच्या मित्र-मैत्रिणींनी ‘लोकमत’ ला सांगितले. त्यांच्या आवडी निवडीबाबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या़
20 वर्षाच्या मैत्रीत आमच्यात कधी भांडण झाले नाही
अभिनेत्री सुरभी हांडे हीला अनेक जण म्हाळसा म्हणून ओळखतात़ या म्हाळसाची बालपणाची मैत्रीण आहे अपूर्वा जोशी़ या दोघांच्या बालपणापासूनच्या मैत्रीत आजर्पयत कधी रुसवे, फुगवे, भांडण असा कुठलाच प्रकार झाला नाही हे विशेष़ स्आई-वडीलांमुळे आमची मैत्री झाली़ मनात कुठलाही किंतू परंतू न ठेवता प्रत्येकाला मदत करणे असा सुरभीचा स्वभाव़ तिची बहिण, मी अन् माझा भाऊ आम्ही एकत्र जमलो, धम्माल मजा, मस्ती करतो़ अगदी लहानपणी, करायचो तशीच़़़ बालपणीची आठवण सांगता अपूर्वा म्हणते, सुरभीने कुठलीही वस्तू घेतली, की तिच्यासारखी वस्तू मीपण घ्यायची़ तिने कसा गजरा लावला, अगदी त्याच पध्दतीने गजरा लावायच़े कामात कितीही व्यस्त असली, कुठलेही असली तरी मला पुण्यात नक्की भेटायला येत़े तिला लहानपणापासून गाण, नृत्य आवडत़े सुरभी कितीही मोठी झाली असली, तरी माङयासाठी ती कायम माझी बालपणाची आहे तिच सुरभी आह़े
तनय खूप मेहनती, कधीच कुणाशीही खोटं बोलत नाही
तनयचा अगदी जवळच्या तीन मित्रांपैकी एक राहूल नाथानी़ तीन वर्षापासून राहूल आणि तनय यांची मैत्री आह़े शिकवणी दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली़ तनयबद्दल बोलताना राहूल सांगतो, तनयला खेळायला खूप आवडत़े तो खूप मेहनती आह़े एकदाची काही गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही़ त्याला खाण्यात पनीर खूप आवडत़े तो कधी कुणाशीही खोटे बोलत नाही़ विनाकारण जर त्याला कुणी त्रास दिला तर त्याला आवडत नाही़ जेव्हा कुणी भेटल्यावर म्हणते, अरे तू त्या तनयचा मित्र आहेस ना? यावेळी खूप अभिमान वाटतो़ जगभर तनयने आपली ओळख निमार्ण केली आह़े मात्र त्याचा तसूभरही गर्व नाही़ जेव्हाही आम्ही एकत्र भेटतो, तेव्हा तो कधी त्याच्या कामाबद्दल बढाई मारत नाही़ दरवेळी काहीतरी नवीन गोष्ट शिकल्याचे सांगतो़ मला जेव्हाही भेटतो तो सुपरस्टार नाही तर माझा मित्र तनय म्हणूनच़