शेतकरी संपामुळे भुसावळात टमाटे 80 रुपये किलो
By admin | Published: June 2, 2017 05:06 PM2017-06-02T17:06:02+5:302017-06-02T17:06:02+5:30
नाशिकसह मनमाड भागातून येणारा टमाटा तसेच मेथी व मिरचीची आवक कमी झाल्याने शुक्रवारी टमाटा चक्क 80 रुपये किलोने विक्री होत असल्याचे चित्र होत़े
Next
>ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.2 - शेतकरी कजर्माफीसाठी बळीराजा 1 जूनपासून संपावर उतरल्याने त्याचा फटका शहराच्या भाजी बाजाराला बसला आह़े नाशिकसह मनमाड भागातून येणारा टमाटा तसेच मेथी व मिरचीची आवक कमी झाल्याने शुक्रवारी टमाटा चक्क 80 रुपये किलोने विक्री होत असल्याचे चित्र होत़े वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांनीदेखील खरेदीसाठी आखडता हात घेतल्याचे दिसून आल़े
शहरात शेतकरी संपाचा फारसा फटका बसला नसलातरी कृउबात मात्र धान्याची आवक 40 टक्क्यांनी घटली आह़े कृउबाने शेतक:यांना धान्य आणण्याचे आवाहन केले असलेतरी शेतकरीही संपावर गेल्याने तुरळक शेतकरीच आपला शेतमाल कृउबात आणत होते. त्यामुळे हमालांनादेखील रोजगाराची चिंता सतावू लागली आह़े
टमाटय़ाचे भाव वधारले
शुक्रवारी टमाटा चक्क 80 रुपये किलोप्रमाणे विक्री होत असल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक भरूदड बसला़ विक्रेत्यांच्या माहितीनुसार शुक्रवारी भाजीपाल्याचे लिलाव झाले असलेतरी मुळात टमाटा हा नाशिक भागातून येत असल्याने व तेथे संपामुळे भाजीपाला बाहेर जात नसल्याने टमाटय़ाचे भाव वाढले आहेत़