जळगावच्या बाजारपेठेत टमाटे वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:01 PM2019-05-31T12:01:45+5:302019-05-31T12:02:21+5:30

५०० रुपये प्रती क्विंटलने वाढले

Tomatoes rose in Jalgaon market | जळगावच्या बाजारपेठेत टमाटे वधारले

जळगावच्या बाजारपेठेत टमाटे वधारले

Next

जळगाव : वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने टमाट्याचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्याचे दर ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.
गेल्या आठवड्यात १००० ते ३१०० रुपये प्रती क्विंटल असलेल टमाट्याचे दर हे १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. टमाट्यासह इतरही भाज्यांचे दर वाढतच आहे. दोन आठवड्यांपूर्वी वधारलेले वांग्याचे दर सध्या स्थिर असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक घटली असून त्याचे दरही वाढून ३०० ते ८०० रुपये प्रती क्विंटलवरून ३५० ते ११०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.
या सोबतच कारले १४०० ते ३००० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. बटाटे ५०० ते १०५० रुपये प्रती क्विंटल, भेंडी ११०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल, कैरी २०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल, खिरा ७०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - १२०० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, गवार - २५०० रुपये प्रती क्विंटल, कोथिंबीर - १००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ४०० ते १००० रुपये प्रती क्विंटल, मेथी २००० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, पालक १६०० रुपये प्रती क्विंटल, अद्रक २५०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची १८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - ८०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल, गिलके १००० ते २८०० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - १२०० ते ३२०० रुपये प्रती क्विंटल.

Web Title: Tomatoes rose in Jalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव