गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जळगाव राज्यात ‘टॉप फाईव्ह’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:45 AM2019-02-24T11:45:05+5:302019-02-24T11:48:13+5:30

भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जानेवारी महिन्यात जळगाव राज्यात चौथ्या तर नाशिक परिक्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे दोष सिध्दीचे प्रमाण ५०.१२ टक्के असून १५ हजार १२३ गुन्ह्यांपैकी ७ हजार ५८० गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे. जिल्ह्यांमध्ये नागपूर ग्रामीण प्रथम (७७.७९ टक्के) तर जळगाव जिल्हा चौथ्या (६५.१२ टक्के) क्रमांकावर आहे. 

In the top-five of the Jalgaon state, | गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जळगाव राज्यात ‘टॉप फाईव्ह’मध्ये

गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जळगाव राज्यात ‘टॉप फाईव्ह’मध्ये

Next
ठळक मुद्दे सीआयडीचा पोलीस महासंचालकांना अहवाल   राज्यात ५२ टक्के गुन्ह्यात फिर्यादी, साक्षीदार फितूर

  सुनील पाटील
  जळगाव : भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जानेवारी महिन्यात जळगाव राज्यात चौथ्या तर नाशिक परिक्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे दोष सिध्दीचे प्रमाण ५०.१२ टक्के असून १५ हजार १२३ गुन्ह्यांपैकी ७ हजार ५८० गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे. जिल्ह्यांमध्ये नागपूर ग्रामीण प्रथम (७७.७९ टक्के) तर जळगाव जिल्हा चौथ्या (६५.१२ टक्के) क्रमांकावर आहे. 
राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे राज्यातील आयुक्तालये व जिल्हास्तरावरील गुन्हे व दोषसिध्दीचा अहवाल पाठविला आहे.
आयुक्तालयात पिंपरी चिंचवड तर जिल्हास्तरावर नागपूर ग्रामीण प्रथम क्रमांकावर आहे. सत्र न्यायालयातून निकाल लागलेल्या भादवि अंतर्गत दोषसिध्दीचे न्रमाण १९.३१ टक्के तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातून निकाल लागलेल्या गुन्ह्यांचे दोषसिध्दीचे प्रमाण ५१.८७ टक्के इतके आहे.   
 दरम्यान, न्यायालयात एकूण ७ हजार ५४३ निर्दोष झालेल्या गुन्ह्यांपैकी ३ हजार ९७३ (५२.६७ टक्के) गुन्ह्यांमध्ये फिर्यादी, साक्षीदार व पंच फि तूर झालेले आहेत. यवतमाळमध्ये सर्वाधिक २४१ गुन्ह्यात पंच, फिर्यादी व साक्षीदार फितूर झाले आहेत. जळगावही राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. त्यात ५३ गुन्ह्यात फितूरचे प्रमाण आहे. फिर्यादी फितूर होऊन गुन्हे निर्दोेष सुटण्याची टक्केवारी १३.८९ इतकी आहे. 
   अनुसूचित जाती-जमातीच्या गुन्ह्यात ७ टक्के शिक्षा  
राज्यात जानेवारी महिन्यात अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत ७ .७ टक्के गुन्हयात शिक्षा झालेली आहे. ९९ पैकी फक्त ७ गुन्ह्यात शिक्षा झाली आहे. उस्मानाबाद व बीडमध्ये सर्वाधिक शिक्षा झालेल्या आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये शंभर टक्के शिक्षा झाल्या आहेत. अहमदनगरमध्येही एका प्रकरणात शिक्षा लागलेली आहे.  
  बेशिस्त वाहतूक गुन्ह्यात शिक्षेत जळगाव प्रथम  
   डिसेंबर महिन्याच्या दोषसिध्दीच्या प्रमाणाची तुलना केली असता, चालू महिन्यात १४.५७ टक्क्याने घट झालेली आहे.तसेच तत्सम महिन्याच्या तुलनेत २०.४३ ने वाढ झालेली आहे. एकुण शिक्षा झालेल्या ७ हजार ५८० गुन्ह्यांमध्ये भादवि कलम २८३ (बेशिस्त वाहतूक, रस्त्यात अडथळा) ३ हजार ९५३ गुन्ह्यात दंडाची शिक्षा झालेली आहे. त्यात सर्वाधिक शिक्षा जळगाव जिल्ह्यात (३४६) झालेल्या आहेत. मुंबई शहर (२६३) दुसºया तर पुणे ग्रामीण तिस-या (२१८) क्रमांकावर आहे.  

महिला अत्याचार व खुनाच्या गुन्ह्यात मात्र घट

अपघात व इतर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण कौतुकास्पद असले तरी महिला अत्याचार व खुन तसेच खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण संपूर्ण राज्यातच कमी आहे. जानेवारी महिन्यात महिला अत्याचाराच्या ८६९ गुन्ह्यापैकी फक्त १०३ गुन्ह्यातच (११.८५ टक्के) शिक्षा झालेली आहे. बलात्काराच्या २३७ गुन्ह्यांपैकी फक्त ५९ गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रमुख गुन्ह्यांचे दोषसिध्दीचे प्रमाण चिंताजनकच असल्याचे सीआयडीच्या अहवालात म्हटले आहे.
गुन्ह्यांमध्ये दोषसिध्दीचे प्रमाण वाढावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जावून आढावा घेवून काही सूचना केल्या होत्या. त्यामुळे उच्च पदस्थ पोलीस अधिकारी स्वत: गांभीर्याने लक्ष घालून गुन्ह्यांची दर पंधरा दिवसात माहिती व आढावा घेतात. दोषारोप सदोष कसे पाठविता येईल, यासाठी काळजीपूर्वक काम होऊ लागले. साक्षीदारांना संरक्षण मिळू लागल्याने ते निर्भीडपणे साक्षी देत आहेत त्यामुळे दोषसिध्दीचे प्रमाण वाढले आहे. जळगाव चौथ्या क्रमांकावर असल्याने नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात प्रेमप्रकरणाचेच अधिक प्रकरणे आहेत. लग्नानंतर ही केस आणखी कमकुवत होते, त्यामुळे या गुन्ह्यात दोषसिध्दीचे प्रमाण कमी आहे.
-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील

७५४३ गुन्हे निर्दोष
३९७३ गुन्ह्यात फिर्यादी, साक्षीदार फितूर
१०३ महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा
३९५३ अपघाताच्या गुन्ह्यात शिक्षा

असे आहेत शिक्षेतील टॉप फाईव्ह जिल्हे

नागपुर ग्रामीण : ७७.८९ टक्के
ठाणे ग्रामीण : ७४ टक्के
चंद्रपुर : ६९.६८ टक्के
जळगाव : ६५.१२ टक्के
गोंदीया : ६०.३१ टक्के

असे आहेत शिक्षेतील टॉप फाईव्ह आयुक्तालये

पिंपरी-चिंचवड : ८९.०४ टक्के
पुणे शहर : ८४.३२ टक्के
सोलापुर शहर : ८३.६५ टक्के
मुंबई शहर : ५७.८१ टक्के
नाशिक शहर :  ५५.५९ टक्के 

Web Title: In the top-five of the Jalgaon state,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.