भुसावळ येथे वाहनांवर तुफान दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:00 PM2019-04-04T21:00:08+5:302019-04-04T21:00:27+5:30

भुसावळ-जामनेर रस्त्यावर दरोड्याचा प्रयत्न फसला : वीस वर्षानंतर दरोडेखोरांचा पुन्हा थरार

Tornado stones on vehicles at Bhusawal | भुसावळ येथे वाहनांवर तुफान दगडफेक

भुसावळ येथे वाहनांवर तुफान दगडफेक

googlenewsNext


भुसावळ : भुसावळ- जामनेर रस्त्यावर दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. ही घटना कुºहे ( पानाचे ) गावापासून चार कि. मी. अंतरावर महादेव तांडा पोलीस चौकी जवळ, बारा नंबर झोपडपट्टी लगत गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली.
दरोडेखोरांनी तीन-चार मालट्रकवर तुफान दगडफेक केली. यात ट्रकांच्या काचा फोडण्यात आल्या.
दरोडेखोरांच्या या थरारामुळे कमालीचे भेदरलेले ट्रकचालक कुºहे ( पानाचे) येथील बसस्थानकावर थांबून होते.
पोलीस उशीराने दाखल
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, मात्र पोलीस एक तास उशीराने घटनास्थळी दाखल झाले.तोपर्यंत दरोडेखोर दुचाकीवरुन पसार झाले. घटनास्थळी रस्त्यावर पडलेले दगड पोलिसांनाही दिसून आले.
तब्बल बावीस वर्षांनंतर या रस्त्यावर दरोड्याचा प्रयत्न झाल्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
भुसावळ - जामनेर हा रस्ता राज्यमार्ग आहे. या मार्गावरून रात्रीच्या वेळेसही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास जामनेरकडून मालवाहतूक ट्रक येत असताना बारा नंबर झोपडी जवळ जंगलात तीन-चार लोक रस्त्याच्या बाजूला बसले होत तर दोन दुचाकीही बाजूला लावण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या एका बाजूला मोठ - मोठे दगड ठेवण्यात आले होते. प्रसंगी या दोन ट्रक थांबण्याचा दरोडेखोरांनी प्रयत्न केला. मात्र ट्रक चालकांनी चढाव असतानाही ट्रक न थांबवता भुसावळकडे येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकवर दरोडेखोरांनी दगडफेक तुफान दगडफे केली. या दगडफेकीत ट्रकच्या काचा फुटल्या. ट्रकच्या कॅबिनमधील पंखाही तुटला. सुदैवाने चालकाला मात्र कोणतीही इजा झाली नाही . ही आपबीती ट्रक चालकांनी कुºहे येथे आल्यानंतर रिक्षाचालकांना सांगितली. त्यांनी तालुका पोलीस ठाण्याला फोन करून माहिती दिली.
प्रस्तुत प्रतिनिधीने तालुका पोलीस स्टेशनला फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मालट्रक थांबवण्यात येत असल्याचा फोन आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेनंतर पोलिसांचे वाहन एक तासाने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत भुसावळकडून येणारी वाहने कुºहे (पानाचे) येथे थांबल्यामुळे बस स्थानकावर वाहनांची गर्दी झाली होती. पोलिसांची गाडी आल्याचे पाहून दरोडेखोर दुचाकीवरुन पसार झाले. त्यानंतर मात्र वाहतूक सुरळीत झाली.
१९९७ च्या बसवरील दरोड्याची आठवण
या रस्त्यावर १९९७ च्या दरम्यान एसटी बसवर दरोडा पडला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. महादेव तांडा फाट्याजवळ पोलीस चौकीची निर्मितीही करण्यात आली होती. त्यानंतरही दरोडेखोरांनी दुचाकी स्वारांना लुटले होते. त्यावेळी एकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.परिणामी तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी पोलीस चौकीवर रात्री पोलीस नेमून एकावेळेस पाच वाहने सोडून सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही वषार्पासून पोलिसांनी सुरक्षा काढून टाकली. कुºहे ( पानाचे ) येथे रात्री पोलिसांची गाडी थांबलेली असते व गावात थांबूनच वाहनांना सुरक्षा देण्याऐवजी वाहने तपासणी करण्याच्या नावाखाली दंड वसूल करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Tornado stones on vehicles at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.