मध्यप्रदेशातील मुसळधार पावसाने हतनुरचे ३६ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:14 PM2019-07-29T12:14:16+5:302019-07-29T12:17:34+5:30

जिल्हाभरातही सलग चौध्या दिवशी संततधार

The torrential rains in Madhya Pradesh have opened three doors for Hatnur | मध्यप्रदेशातील मुसळधार पावसाने हतनुरचे ३६ दरवाजे उघडले

मध्यप्रदेशातील मुसळधार पावसाने हतनुरचे ३६ दरवाजे उघडले

Next

जळगाव: धरणक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून होणारा संततधार पाऊस व बºहाणपूरात होणाऱ्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग झाल्याने हतनुर धरणाचे १४ दरवाजे पूर्ण तर २२ दरवाजे एक मिटरने उघडण्यात आले आहे़
सोमवारीही जिल्हाभरात संततधार पाऊस सुरूच होता़ या पावसामुळे मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठा वाढण्यास काही अंशी मदत झाली आहे़ पिकांनाही जीवदान मिळाले आहे़ जळगाव शहरात रविवारी रात्री तसेच सोमवारीही पावसाने दमदार हजेरी लावली होती़ बºहाणपूर येथे २६१ मिमि पावसाची नोंद झाली आहे़ सततच्या या पावसामुळे हतनूर धरणात पाण्याचा विसर्ग वाढला आहे़ त्यामुळे हे दरवाजे उघडण्यात आले आहे़
दरम्यान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़ त्यामुळे आगामी काही दिवस हा पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे़ पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे़

Web Title: The torrential rains in Madhya Pradesh have opened three doors for Hatnur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव