तुरीचे विक्रमी उत्पादन मात्र विक्रीचे ‘टेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2017 05:21 PM2017-04-09T17:21:26+5:302017-04-09T17:21:26+5:30

तुरीचे भरघोस उत्पन्न झाले आहे. मात्र शासकीय खरेदीसाठी ठराविक मर्यादा असल्याने उर्वरित तुरीचे काय? असा प्रश्न शेतक:यांना पडला आहे.

Tory's record sales | तुरीचे विक्रमी उत्पादन मात्र विक्रीचे ‘टेन्शन’

तुरीचे विक्रमी उत्पादन मात्र विक्रीचे ‘टेन्शन’

Next

 पाचोरा,दि.9- यंदा मुबलक पाणी आणि पोषक वातावरणामुळे तुरीचे भरघोस उत्पन्न झाले आहे. मात्र शासकीय खरेदीसाठी ठराविक मर्यादा असल्याने उर्वरित तुरीचे काय? असा प्रश्न शेतक:यांना पडला आहे. ही तूर व्यापा:यांकडे कमी भावामध्ये विकावी लागत आहे. तर दुसरीकडे केंद्रावर प्रचंड गर्दी असल्याने प्रतिक्षेत थांबून रहावे लागत असल्याने शेतक:यांचे नुकसान होत आहे.

गेल्या वर्षी  तुर डाळीचे भाव मोठय़ा प्रमाणात वाढले.  8 ते 9 हजार  प्रती क्विंटल तुरीचा भाव बाजारात होता. त्यानुसार शेतक:यांनी मोठय़ा  प्रमाणात तुरीची लागवड केल्याने विक्रमी उत्पन्न झाले. मात्र भरघोस उत्पन्नामुळे बाजारात तुरीचा भाव निम्म्याने खाली आला व शेतकरी हवालदिल झाला.  शासनाने नाफेड अंतर्गत एफ एक्यू नुसार प्रती क्विंटल  5 हजार 50  हमी भाव ठरवून तुरीची  राज्यात शासकीय तूर खरेदी सुरु केली. यामुळे शेतक:याना दिलासा मिळाला. मात्र तूर खरेदीला मर्यादा घालून दिल्याने विक्रमी उत्पन्न झालेली तूर अन्य शेतक:यांच्या नावे दाखवून विक्रीची वेळी शेतक:यांवर आली. यात व्यापा:यांनी देखील हात धुवून घेतल्याचे चित्र  येथील खरेदी  केंद्रावर पाहायला मिळाले. तालुक्यात नाफेड अंतर्गत  जिल्हा मार्केटींग अधिकारी यांचे अधिपत्याखाली सब एजंट म्हणून तालुका शेतकरी सह. संघाने शासकीय तूर खरेदी फेब्रुवारीत 10 क्विंटल व प्रती एकरी 4 क्विंटल प्रमाणे  खरेदी मर्यादा घालवून दिल्याने दज्रेदार बियाणे व योग्य हवामान, भरपूर पाऊस झाल्याने शेतक:यांना प्रती एकरी  7 ते 8 क्विंटलचे भरघोस उत्पन्न झाले. मात्र बाजारात तुरीचे भाव अचानक कोसळले.  3 ते 4 हजार प्रती क्विंटलने शेतक:याने सुरुवातीला व्यापा:यांच्या हातात माल दिला. शासनाने  5 हजार 50 क्विंटल भाव देवून  खरेदी सुरु केली. पाचोरा येथे वखार महामंडळाच्या यार्डात खरेदी सुरु केली. कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात  वाहने उभे करुन टोकन पध्दतीने माल मोजणे सुरु केले. 
हमालांना मिळते मजुरी
दरम्यान या खरेदी केंद्रावरील त्रुटी अडचणी संदर्भात शेतकी संघाचे सुपरवायझर  ग्रेडर याचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शासन  निकषाप्रमाणे तूर मोजणी होत असून  हमालांना शेतक:यांकडून प्रती क्विंटल 40 रु. मजुरी मिळते. शासनाकडून हमाली उशीरा मिळणार आहे.  
मोजणी मध्ये घोटाळ्याचा आरोप
माल मोजणीसाठी शेतक:यांना 40 रुपये प्रती क्विंटल हमाली वैयक्तिक द्यावी लागत आहे. वास्तविक मोजणीची जबाबदारी खरेदीदाराची असते असे असताना जादा पैसे घेतले जात आहे. त्यातच बारदान गोणीचे वजन 550 ग्रॅम असताना हमाल व  संबंधित यंत्रणेच्या संगनमताने प्रत्येक 50 किलो गोणी मागे 200 ग्रॅम तूर जास्त मोजत असल्याची प्रतिक्रिया केंद्रावर शेतक:यांनी दिली. 
गैरव्यवहार नसल्याचा दावा
आजर्पयत 9500 गोण्यामध्ये तूर मोजणी झाली असून अंदाजे 17-18 क्विंटल जादा तूर अप्रत्यक्ष मोजणी झाल्याचे दिसून येते. या प्रकरणी  संबंधित अधिका:यांशी चर्चा केली असता माहिती मिळाली की, इलेक्ट्रॉनिक वजनकाटय़ानुसार  मोजणी होते. यात 150 ते 200 ग्रॅम काही गोण्यामध्ये जास्त असेल. मात्र नुकसान भरपाईत ते जमा होते. यामुळे त्यात गैरव्यवहार नाही.
 (वार्ताहर)

Web Title: Tory's record sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.