वीज खांबाच्या तुटलेल्या वायरचा स्पर्श, मंगरूळ येथे तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 21:23 IST2021-05-01T21:22:52+5:302021-05-01T21:23:48+5:30
तुटलेल्या वायरचा स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

वीज खांबाच्या तुटलेल्या वायरचा स्पर्श, मंगरूळ येथे तरुणाचा मृत्यू
अमळनेर : विजेच्या खांबाच्या तुटलेल्या वायरला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ येथे शनिवारी सकाळी दहाला घडली. समाधान ताराचंद घोलप (वय ३४) असे या तरुणाचे नाव आहे.
यावेळी जवळच असलेल्या रोहिदास घोलप यांनी लाकडी दांडक्याने सर्व्हिस वायर बाजूला केली. तेव्हा समाधान खाली पडला. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रोहिदास घोलप यांनी अमळनेर पोलिसात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल जे.डी.पाटील करीत आहेत.