Jalgaon Election Results : माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 08:46 AM2018-08-03T08:46:24+5:302018-08-03T09:09:46+5:30
मनपा निवडणुकीत ९ राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असले तरी मुख्य लढत ही भाजपा व शिवसेनेतच होत आहे.
जळगाव : मनपा निवडणुकीत ९ राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असले तरी मुख्य लढत ही भाजपा व शिवसेनेतच होत आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात लढत होत असून त्यात कोण बाजी मारते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, दोन्ही पक्षांकडून बहुमताचे दावे केले जात आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून मनपावर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत देखील त्यांचे वर्चस्व कायम राहते की ? यावेळी जळगावकर भाजपाला संधी देतात याकडे लक्ष लागले आहे. मनपाच्या ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज फैसला होणार आहे.
मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, १ ऑगस्ट रोजी मतदान झाले. ५५.७२ टक्के मतदान झाले. शुक्रवार, ३ रोजी मतमोजणी असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. एमआयडीसीतील ई-८ सेक्टर गोडाऊनमध्ये सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.