पर्यटनस्थळ पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 03:57 PM2020-06-22T15:57:54+5:302020-06-22T15:57:59+5:30

तीन महिन्यांपासून शुकशुकाट : वनसमितीला उत्पन्न मिळेना

The tourist spot fell dew | पर्यटनस्थळ पडले ओस

पर्यटनस्थळ पडले ओस

Next

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने २२ मार्च पासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली. इतर व्यवहार हळूहळू सुरळीत झाले मात्र पर्यटनस्थळे अद्यापही ओस पडली आहेत.
वनविभागाच्या हद्दीत येणारे हरताळा येथील श्री चक्रधर स्वामी पर्यटन स्थळ, शिवशक्ती मंदिर, मातृपितृ भक्त श्रावण बाळ समाधी मंदिर आदी स्थळी नेहमीच गर्दी होते. मात्र संसर्गाच्या भितीने पर्यटकांनी या निसर्गरम्य स्थळीही पाठ फिरवली आहे.
उन्हाळ्यात देखील अनेक पर्यटक या नयनरम्य ठिकाणाला भेट देत असतात. शैक्षणिक सहलींसह नागरिकही कुटुंबासह येतात. यंदा मात्र भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या शून्यावर आली आहे. पर्यटन स्थळावर व देवालय असून तेथेही शुकशुकाट पहावयास मिळत आहे. येथे असलेले विविध पक्षी, वन्य प्राणी आदी दुर्बिणीद्वारे पाहण्याचा आनंद अनेक जण लुटत असतात. यंदा तलावाला उन्हाळ्यात देखील चांगले पाणी असल्याने अधिकच मोहक वाटत होते.
पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. पावसाळा सोडला तर वर्षभर येथे पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत होते. मात्र मागील तीन महिन्यापासून पर्यटन लॉकडाऊन असल्यामुळे या पर्यटन स्थळावरही पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. आता देवाला या संदर्भात देखील उघड दार देवा आता उघड दार देवा... अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
विविध कामांना लागला ‘ब्रेक’
हरताळे येथील ही विविध मंदिरे व हा निसर्गरम्य परिसर वनविभागाच्या हद्दीत येतो. यापरिसराची देखभाल व विकास करण्याच्या दृष्टीने वनपाल यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची वनसमिती स्थापन केली आहे. या ठिकाणी येणाºया पर्यटकांकडून वनसमितीचे सदस्य शुक्ल आकारतात. याची पावतीही दिली जाते. दरम्यान जमा झालेल्या पैशातून झाडे लावणे, साफसफाई, उद्यान देखभाल आदी विविध कामे केली जातात. मात्र सध्या काहीच उत्पन्न नसल्याने ही विविध कामेही थांबली आहेत.

Web Title: The tourist spot fell dew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.