जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात पार्किंगअभावी पर्यटकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:58 PM2017-12-25T16:58:55+5:302017-12-25T17:05:46+5:30

महाराष्ट्र पर्यटन महामंडळ विभागाचे अभ्यागत केंद्र आहे बंद

Tourists want to stay in the world famous Ajanta Caves area | जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात पार्किंगअभावी पर्यटकांचे हाल

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात पार्किंगअभावी पर्यटकांचे हाल

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र पर्यटन महामंडळ विभागाचे अभ्यागत केंद्र आहे बंदजळगाव-औरंगाबाद महामार्गावरील रहदारी झाली ठप्पसुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची नाराजी

आॅनलाईन लोकमत
वाकोद ता. जामनेर,दि.२५ : शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्टया व नाताळच्या सुटीनिमित्त जगप्रसिद्ध अजिंठा लेणी मध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र पर्यटन विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे फदार्पुर येथील टी पॉईंटवर येणाºया पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. फदार्पुर टी पॉईंट वर महाराष्ट्र पर्यटक महामंडळा ची वाहन व्यवस्था पूर्ण झाल्याने औरंगाबाद - जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटा पासून ते फदार्पुर बसस्थानका पर्यंत वाहनांची रांग लागलेली होती.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळ विभागाचे येथील अभ्यागत केंद्र बंद करण्यात आले आहे. याठिकाणचे गेट देखील पूर्ण पणे बंद केले आहे. हे गेट उघडले असते तर या अभ्यागत केंद्राच्या पार्किंग मध्ये पर्यटकांची वाहने लावली गेली असती. मोठी तारांबळ उडल्यानंतर येथील पोलीस कर्मचाºयांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे स्थानिक व्यवस्थापक यांना विनंती केली. मात्र त्यानंतरही गेट उघडण्यात न आल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा कायम होत्या. या दरम्यान पोलिसांची धावपळ होत होती. जळगाव-औरंगाबाद महामार्गावर वाहनामुळे रहदारी ठप्प झाली. रहदारीची समस्या मोठी होत असताना पोलिसांनी महामंडळाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांशी पुन्हा संपर्क साधून गेट उघण्याची विनंती केली. दुपारनंतर गेट उघडल्याने पर्यटकांची वाहने अभ्यागत केंद्रात लावण्यात आली. मात्र पर्यटकांना बसचे तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यासाºयात बराच वेळ गेल्याने पर्यटकांमध्ये मोठी नाराजी होती.

Web Title: Tourists want to stay in the world famous Ajanta Caves area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.