अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 10:46 PM2021-01-29T22:46:59+5:302021-01-29T22:46:59+5:30
जळगाव : मोहाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर गुरुवारी एमआयडीसी पोलिसांनी पकडले. या प्रकरणी एमआयडीसी ...
जळगाव : मोहाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर गुरुवारी एमआयडीसी पोलिसांनी पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मोहाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील रस्त्यावरून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी मिळाली होती. पोलिसांनी लागलीच दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मोहाडी गाठून ट्रॅक्टर पकडले. दरम्यान, पोलिसांना पाहताच चालक तेथून फरार झाला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.