ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली; दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 17:42 IST2021-03-07T17:42:11+5:302021-03-07T17:42:37+5:30
मुरूम वाहून नेणार्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली; दोघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तालुक्यातील हिरापूर जवळ मुरूम वाहून नेणार्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
हिरापूर येथील रेल्वे स्थानकाजवळील नांदगांव रस्त्यावर मुरूम भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवुन दोन मजुर दबून ठार झाले असल्याची घटना घडली. याच वेळी
या मार्गाने खासदार उन्मेश पाटील जात असताना त्यांनी तात्काळ अंबुलन्स बोलावून, ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना तातडीने जेसीबी घेऊन दबलेल्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावयास सांगितले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला. मात्र दोन्हीजण ट्रॉलीखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी नोंद घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या अपघातातील मृतांची ओळख पटविण्यात आली नाही.