व्यापाऱ्याला गावठी कट्टयाचा धाक दाखवून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:15 PM2020-06-22T17:15:43+5:302020-06-22T17:16:21+5:30

भुसावळात खळबळ

The trader was robbed in fear of the village gang | व्यापाऱ्याला गावठी कट्टयाचा धाक दाखवून लूट

व्यापाऱ्याला गावठी कट्टयाचा धाक दाखवून लूट

Next


भुसावळ : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करताना पोलिसांशी झालेली झटापट व यावेळी गावठी कट्टा खाली पडून राऊंड फायर ही घटना रविवार रोजी दुपारी घडली. त्यानंतर पुन्हा रात्री ११ वाजेच्या सुमारास व्यापाºयाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार झाला. एकाच दिवशी गावठी पिस्तूलचा गोळीबार व धमकावण्याचा घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यापासून शांत असलेल्या शहरात पुन्हा गुन्हेगारीने तोंड वर काढल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.
शनी मंदिर वॉर्डातील व्यापारी राजेश दुबे हे रविवार २१ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भाऊ संतोष दुबे आणि मित्र राहुल चौधरी यांच्यासोबत आठवडे बाजारातील ओट्यावर बसले होते. त्यावेळेस एक अनोळखी युवक येऊन सिगरेट मागू लागला. मात्र सिगारेट नसल्याचे सांगितले असता, त्यांने हुज्जत घातली. तसेच झटापटी नंतर त्याने त्याच्या तिघा मित्रांना बोलवले. त्यानंतर त्यापैकी बाबा काल्या याने राजेश दुबे यांना पिस्तूलचा धाक दाखवून १५ हजाराचा मोबाईल हिसकावून मारहाण केली. यावेळी शहरात पुन्हा गोळीबार झाल्याची चर्चा सुरू झाली व एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच डीवायएसपी गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भगवत , पो. हे. कॉ. संजय भदाणे यांच्या सह इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते.
याप्रकरणी बाबा काल्या आणि रईस (पूर्ण नाव माहित नाही) रा. मुस्लिम कॉलनी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिल मोरे हे तपास करीत आहे.
शहरवासियांमध्ये दहशत
शहर व राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून गुन्हेगारांनीही कोरोनाचा धसका घेऊन शांतता ठेवली होती . मात्र कोरोना शहरातून जाण्याचं नाव घेत नसल्यामुळे गुन्हेगारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून शहरात मामाजी टॉकीज परिसर , श्रीराम नगर यासह विविध ठिकाणी चाकू व तलवार हल्ल्यांच्या घटना घडू लागल्या आहे. त्यात रविवार या एकाच दिवशी दोन खळबळजनक घटना घडल्यामुळे शहरवासियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: The trader was robbed in fear of the village gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.