भडगाव तालुक्यातील कजगाव परिसरात देव उजाळून घेण्याची परंपरा आजही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:56 AM2018-12-26T00:56:36+5:302018-12-26T00:58:19+5:30
लग्नसोहळ्याच्या आधी सोनार बांधवांकडून देव उजाळून घेण्याची परंपरा कजगावसह परिसरात आजही कायम आहे. जुन्या काळातील रूढी परंपरा आजही ग्रामीण भागात कटाक्षाने पाळल्या जातात. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे या परंपरांची कोणतीही माहिती नसलेले युवक-युवती या परंपरांचा मनमुराद आनंद घेतात, कारण त्याची आख्यायिका वडिलधाऱ्या मंडळीकडून मोठ्या कुतूहलाने ऐकली जाते व ते या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. अशीच काही प्रथा ग्रामीण भागात मोठ्या आनंद सोहळ्यात पार पडत असते.
प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव , जि.जळगाव : लग्नसोहळ्याच्या आधी सोनार बांधवांकडून देव उजाळून घेण्याची परंपरा कजगावसह परिसरात आजही कायम आहे.
जुन्या काळातील रूढी परंपरा आजही ग्रामीण भागात कटाक्षाने पाळल्या जातात. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे या परंपरांची कोणतीही माहिती नसलेले युवक-युवती या परंपरांचा मनमुराद आनंद घेतात, कारण त्याची आख्यायिका वडिलधाऱ्या मंडळीकडून मोठ्या कुतूहलाने ऐकली जाते व ते या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. अशीच काही प्रथा ग्रामीण भागात मोठ्या आनंद सोहळ्यात पार पडत असते.
विवाह सोहळा सुरू होताना देवी-देवतांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे. या सोहळ्याची सुरुवात देव उजाळण्यापासून सुरू होते. भाऊबंदकीची देव, हळदीच्या पहिल्या दिवशी सोनार बांधवांकडे देव उजाळण्यासाठी दिले जातात. ते दुसºया दिवशी (हळदीच्या दिवशी) दुपारी सवाद्य मिरवणुकीने लग्न समारंभ स्थळी नेले जातात. या मागचे कारण लग्न सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, सारे कार्य आनंदात व्हावे, अशी या मागील भावना आहे. हळदीच्या कार्यक्रमानंतर रात्री भाऊबंद एकत्र येऊन रात्री देव डोक्यावर घेऊन नाचतात. याप्रमाणे विवाह सोहळ्याची सुरुवात उत्साहात होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर भाऊबंदाचे देव देव्हारी परततात, अशा पध्दतीने लग्न सोहळ्यातील देव उजाळणे कार्यक्रम होत असतो.