मंगळग्रह मंदिरात पारंपरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:18 AM2021-09-19T04:18:23+5:302021-09-19T04:18:23+5:30
फोटो अमळनेर : मंगळदेव ग्रह मंदिरात गुरुवारी पारंपरिक पद्धतीने मंगळ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंगळग्रहाची पंचधातूची उत्सवमूर्ती ...
फोटो
अमळनेर : मंगळदेव ग्रह मंदिरात गुरुवारी पारंपरिक पद्धतीने मंगळ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंगळग्रहाची पंचधातूची उत्सवमूर्ती सजविलेल्या पाळण्यात ठेवून जन्मोत्सव झाला. औरंगाबाद येथील संजय चव्हाण जन्मोत्सव महापूजेचे मानकरी होते.
मंदिराच्या कळसावरील व प्रवेश द्वारावरील ध्वज बदलविण्यात आले, ध्वजाचे मानकरी सुवर्ण व्यापारी तथा बिल्डर योगेश पांडव नवे ध्वज घेऊन सहकुटुंब-सहपरिवार पोहोचले. प्रवेशद्वाराजवळ विधिवतरीत्या दोन्ही ध्वजांचे पूजन झाले. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत वाजत-गाजत ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. विधिवतरीत्या ध्वजारोहण झाले. औरंगाबाद येथील सुवर्णालंकार व्यापारी सुनील गोलटगावकर यांनी जन्मोत्सवानिमित्त मंदिरातील भूमी मातेला चांदीचा मुकुट भेट दिला.
जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराला सजविण्यात आले होते. दरवर्षी जन्मोत्सवाला श्री मंगळदेव ग्रहाच्या मूर्तीला वेगवेगळ्या रुपात सजविण्यात येते. यावर्षी मूर्तीला सिंहसनस्थ राजेशाही रूप देण्यात आले होते. भाविकांना जन्मोत्सवाचा वैशिष्टपूर्ण पंजिरी व खोबरा बर्फीचा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी.ए. सोनवणे, आनंद महाले, विनोद कदम, विनोद अग्रवाल, हरिओम अग्रवाल, एम.जी. पाटील, जी.एस. चौधरी आदींसह भाविक उपस्थित होते. प्रसाद भंडारी हे मुख्य पुरोहित होते. त्यांना पुजारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, अक्षय जोशी, मेहुल कुलकर्णी, नीलेश भंडारी यांनी सहकार्य केलेे.