कल्याण येथील 'पत्री पूल' रेल्वे पुलासाठी रेल्वे रुळांवर ७७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक अनेक गाड्यांवर होणार परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 02:06 PM2020-11-19T14:06:24+5:302020-11-19T14:07:21+5:30
मध्य रेल्वे मुंबई विभागातील कल्याण येथे पत्री पूल रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वेमार्गावर ७६.६७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ४ ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक संचलित करणार आहे.
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागातील कल्याण येथे पत्री पूल रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वेमार्गावर ७६.६७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ४ ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक संचलित करणार आहे. यामुळे अनेक प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार आहे
ब्लॉक १ : २१ रोजी सकाळी १०.१५ ते दुपारी २.१५ पर्यंत
उपनगरी गाड्या रद्द
डोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान सकाळी ९.५० ते दुपारी २.१५ दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
गाड्यांचे डायव्हर्शन ०२१६८ मंडुआडीह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष,०१०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा विशेष, ०२५४२ लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष आणि ०१०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस -दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे वळविण्यात येणार आहेत. कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.
गाड्यांचे नियमन- ०२८१२ हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), ०१०९४ वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे), ०२६१७ एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) आणि०४१५१ कानपूर - लो.टिळक टर्मिनस विशेष गाड्या वाटेमध्ये १५ ते १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.
गाड्यांचे वेळापत्रक पुन:निर्धारण
०१०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष २१रोजी दुपारी २.०० वाजता सुटेल आणि ०१०९३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी विशेष . २२.रोजी मध्यरात्री ०१.०० वाजता सुटेल.
ब्लॉक २ : रविवार, २२ रोजी सकाळी ९.५० ते दुपारी १.५० पर्यंत
उपनगरी गाड्या रद्द
डोंबिवली ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी ९.२० ते दुपारी १.५० दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
गाड्यांचे डायव्हर्शन
०३२०१ पाटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, ०२१८७ जबलपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष,०२१६८ मंडुआडीह - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, ०१०५५लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर विशेष, ०२५४२ लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष आणि ०१०६१लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा -वसई रोड -जळगाव मार्गे वळविण्यात येतील.
कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.
गाड्यांचे नियमन- ०८२२५ हटिया- लो.टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), ०१०९४ वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे) आणि ०२६१७ एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) २० मिनिट ते १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.
गाड्यांचे वेळापत्रक पुनःनिर्धारण
०१०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष . २२ रोजी दुपारी १.४० वाजता सुटेल, ०२१८८छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -जबलपूर विशेष २२ रोजी दुपारी २.५५ वाजता सुटेल आणि ०२५८६ लोकमान्य टिळक टर्मिनस - बरौनी विशेष २२ रोजी दुपारी २.०० वाजता सुटेल.