सुरत रेल्वेगेटवर वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:03+5:302020-12-16T04:32:03+5:30
जळगाव : वॉटरग्रेस कंपनीने उपठेका दिल्याबाबतचा करार युनियन बँकेकडे दिला असून, याबाबत मनपा प्रशासनाने युनियन बँकेला नोटीस बजावली आहे. ...
जळगाव : वॉटरग्रेस कंपनीने उपठेका दिल्याबाबतचा करार युनियन बँकेकडे दिला असून, याबाबत मनपा प्रशासनाने युनियन बँकेला नोटीस बजावली आहे. तसेच खुलासा सादर करण्याची सूचना दिली आहे. दरम्यान, युनियन बँकेने अद्यापही खुलासा सादर केलेला नाही.
चार दिवसांनंतर सूर्यदर्शन
जळगाव : गेल्या चार दिवसांपासून शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ढगाळ वातावरण कायम होते. मात्र, मंगळवारी ढगाळ वातावरण कमी होऊन सूर्यदर्शन झाले. यामुळे कमाल तापमानात चार अंशांची वाढ झाली आहे. तसेच सकाळच्या वेळेस काही प्रमाणात धुके दिसून आले. दरम्यान, आगामी तीन दिवसांत शहरात थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नवलनगरातील अतिक्रमण काढा
जळगाव : ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मंगळवारी उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १६ मध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांनी विविध तक्रारींचा पाढा वाचला. नवलनगर भागातील मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असल्याने या रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण होते, अशी तक्रार नागरिकांनी केली. त्यानंतर उपमहापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
सुरत रेल्वेगेटवर वाहतूककोंडी
जळगाव : शहरातील सुरत रेल्वेगेटवर मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पाऊण तास वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे वाहनधारकांचे
मोठ्या प्रमाणात हाल झाले. सकाळी १० वाजता रेल्वेगेट लवकर बंद झाल्याने व एकाचवेळी दोन रेल्वेगाड्या क्रॉस झाल्यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूस
वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे पाऊण तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे काही वाहनधारकांचे किरकोळ वाददेखील झाले.