रेल्वे व्ॉगन घसरल्याने वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 12:45 AM2017-01-20T00:45:10+5:302017-01-20T00:45:10+5:30
भुसावळ : मध्य रेल्वेच्या निफाड येथील रेल्वेस्थानकावर ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) वायर दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक व्ॉगन रुळावरुन घसरली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
भुसावळ : मध्य रेल्वेच्या निफाड येथील रेल्वेस्थानकावर ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) वायर दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक व्ॉगन रुळावरुन घसरली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ही घटना गुरुवारी दुपारी 2.45 वाजता घडली.
निफाड येथील रेल्वेस्थानकाच्या मुंबई एण्डला निफाड गेटवर ओएचई ट्रॉली व्ॉगन अचानक रुळावरुन घसरल्याने हा अपघात झाला. सायंकाळी उशिरार्पयत ही व्ॉगन ट्रॉली रुळावर घेण्याचे काम सुरू होते, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, भुसावळ रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. यामुळे काही गाडय़ा एक ते दोन तास उशिराने धावत होत्या. अप मार्गावरुन गाडय़ा सोडण्यात आल्याचे ते म्हणाले.
या अपघातामुळे डाऊन मार्गावरील 11061 पवन एक्स्प्रेस, 11071 कामायनी एक्स्प्रेस, 12617 मंगला एक्स्प्रेस व 85505 गोदावरी एक्स्प्रेस या गाडय़ा विलंबाने धावत होत्या. 12860 अप गीतांजली एक्स्प्रेस देखील एक तास विलंबाने धावत होती. 11059 गोदान एक्स्प्रेस, 12542 मुंबई- गोरखपूर संत कबीरधाम सुपर फास्ट एक्स्प्रेस व जनसाधारण या गाडय़ांना विलंब झाला. रात्री उशिरा वाहतूक सुरळीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.