अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:30 AM2021-02-28T04:30:32+5:302021-02-28T04:30:32+5:30

सुभाष चौक परिसरात गर्दी कायम जळगाव : भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करताना गर्दी होऊ नये म्हणून जिल्ह्यात आठवडे ...

Traffic jam due to awkward parking | अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी

अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी

Next

सुभाष चौक परिसरात गर्दी कायम

जळगाव : भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करताना गर्दी होऊ नये म्हणून जिल्ह्यात आठवडे बाजार बंद केले आहे. मात्र सुभाष चौक परिसरात भाजीपाला, फळ व इतर साहित्य विक्रीची दुकाने कायम असल्याने येथे गर्दी होत आहे.

पुन्हा जैसे थे स्थिती

जळगाव : महात्मा फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट परिसरात तीन दिवसांपूर्वी अतिक्रमण निर्मूलन विभागाने अतिक्रमण काढल्यानंतर आता तेथे पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. हे अतिक्रमण कायम हटवावे, अशी मागणी होत आहे.

कामानंतर रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

जळगाव : प्रभात चौक ते मू.जे. महाविद्यालय रस्त्यावर केबल टाकण्यासाठी तीन ठिकाणी रस्ता खोदण्यात आला. मात्र त्यानंतर तेथे केवळ काढलेली मातीच टाकून हे काम तसेच सोडून दिले आहे. डांबर नसल्याने खडे इतरत्र पसरून वाहनांना धोका निर्माण होत आहे.

संत रवीदास महाराज जयंतीनिमित

जळगाव : संत रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन संत रवीदास महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अव्वल कारकून आर. एस. पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Traffic jam due to awkward parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.