इच्छादेवी चौकात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:16 AM2021-05-26T04:16:17+5:302021-05-26T04:16:17+5:30
नागरिकांचा उडतोय गोंधळ जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरण एक दिवस सुरू तर एक दिवस बंद राहत असल्याने नागरिकांचा गोंधळ ...
नागरिकांचा उडतोय गोंधळ
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरण एक दिवस सुरू तर एक दिवस बंद राहत असल्याने नागरिकांचा गोंधळ उडत आहे. शहरातील केंद्रांवर आता कमी प्रमाणात लसीचा पुरवठा होत असल्याने आठवड्यातील तीन ते चार दिवसच लसीकरण होत असल्याने गोंधळ होत आहे.
नातेवाईक असतात प्रतीक्षेत
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाहेर आताही रुग्णांचे नातेवाईक हे प्रतीक्षेत थांबून असतात, ज्यांना शक्य होते ते पीपीई किट घालून आत जात असतात. मात्र, ज्यांना शक्य होत नाही ते बाहेर बसून वाट बघत असतात. रुग्णालयासमोर हे नातेवाईक बसून असतात. गेल्या महिना-दीड महिन्यापासून हे चित्र आहे.
तपासण्यांची संख्या वाढली
जळगाव : जिल्हाभरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. सोमवारी ११ हजारांवर चाचण्या करण्यात आल्या. मात्र, यात अँटिजनचे प्रमाण हे अद्यापही आरटीपीसीआरपेक्षा अधिक आहे. आताच्या परिस्थितीत आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, तसे नियोजन प्रशासनाकडून होत नसल्याने अँटिजन चाचण्याच अधिक होत आहेत.