शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:24 PM2020-07-17T12:24:18+5:302020-07-17T12:24:30+5:30
जळगाव : शहरातील मुख्य रस्ते बंद केल्यामुळे शिवाजीनगर, बळीराम पेठ, ममुराबादकडून येणाऱ्या नागरिकांना शहरात येण्यासाठी जिल्हा परिषदेकडून एकमेव मार्ग ...
जळगाव : शहरातील मुख्य रस्ते बंद केल्यामुळे शिवाजीनगर, बळीराम पेठ, ममुराबादकडून येणाऱ्या नागरिकांना शहरात येण्यासाठी जिल्हा परिषदेकडून एकमेव मार्ग उपलब्ध आहे. मात्र, याठिकाणी सर्वच वाहतूक एकाच वेळी एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. गुरुवारी देखील दुपारी ३ वाजेच्या सुमारास तब्बल दोन तास वाहतूककोंडी झाल्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. त्याठिकाणी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पाहणी केल्यानंतर शहर वाहतूक पोलीसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. तसेच या ठिकाणी वाहतूक कोंडी होवू नये म्हणून ग.स.सोसायटीकडून शहर पोलीस स्टेशनमार्गे टॉवर चौकात जाण्यासाठी एकेरी मार्ग सुरु करण्यात आला आहे.
मध्यवर्ती भागात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रस्ते सील केले आहेत. मात्र, तब्बल ५० हजार नागरिकांना शहरात येण्यासाठी जिल्हा परिषद जवळील पत्र्या हनुमान मंदिराजवळील एकमेव रस्ता उपलब्ध आहे.
ग.स.सोसायटीकडून येण्यासाठी रस्ता सुरु
जिल्हा परिषद चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने उपायुक्तांनी बळीराम पेठ, शनिपेठ व ममुराबादकडून येणाºया वाहनांसाठी ग.स.सोसायटी, मनोहर साडीच्या दुकानाकडून थेट टॉवर चौकात येण्यासाठी मार्ग खुला केला आहे. मात्र, या भागात जाण्यासाठी केवळ जि.प.कडील रस्ताच पर्याय म्हणून ठेवला आहे.
व्यापाऱ्यांना वाहने घेवून जाण्याची परवानगी द्यावी
मनपाने मुख्य बाजारपेठेचा भाग ‘नो व्हेहीकल झोन’ म्हणून निश्चित केला असला तरी या भागात ज्या व्यापाºयांचे दुकान व इतर व्यवसाय सुरु आहेत. अशा व्यापाºयांना आपले वाहने घेवून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या भागातील व्यापाºयांनी केली आहे. याबाबत काही व्यापारी महापौरांना देखील भेटले. व्यापाºयांना आपली वाहने दुकानापासून खूप दुर उभी करावी लागत आहेत. अनेकदा व्यापाºयांकडे काही पैशांची रक्कम देखील असते. ती रक्कम हातातच घेवून जावी लागते. यामुळे चोरी देखील होण्याची भिती व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.