महामार्गावर पुन्हा एकदा गतिरोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:48 AM2021-01-08T04:48:24+5:302021-01-08T04:48:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही महिने आधी जळगाव शहरात महामार्गावर लावलेले गतिरोधक हटवण्यात आले होते. त्यानंतर महामार्गाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही महिने आधी जळगाव शहरात महामार्गावर लावलेले गतिरोधक हटवण्यात आले होते. त्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. आता या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग वाढला आहे. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून महामार्ग प्राधिकरणाने अजिंठा चौफुलीच्या जवळ दोन गतिरोधकांची उभारणी केली आहे. त्यामुळे वेगाला लगाम बसणार आहे. आता त्यावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
महामार्गावर बॉम्बे बेकरीजवळ काही दिवस आधी अपघात झाला होता. मागून येणाऱ्या ट्रकच्या वेगामुळे हा अपघात झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळी केला होता. मात्र त्यामुळे सालारनगर, बॉम्बे बेकरीजवळ वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसवणे अपेक्षित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा ठेकेदार असलेल्या कंपनीने घटनास्थळापासून जवळपास अर्धा किमीपेक्षा जास्त अंतर असलेल्या ठिकाणी हे गतिरोधक बसवले आहेत. त्यामुळे सालारनगर परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.