हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी; ११ जणांविरुद्ध गुन्हा, चार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 08:34 PM2019-06-09T20:34:00+5:302019-06-09T20:34:23+5:30
कोळीपेठेतील राजू गोविंदा कोळी याचा शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता.
जळगाव: हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना जळगावच्या कोळीपेठेत शनिवारी रात्री ९़. ३० वाजता घडली. याप्रकरणी पोलिसात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे.
कोळीपेठेतील राजू गोविंदा कोळी याचा शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने गल्लीतील मित्रमंडळी बॅण्डच्या तालावर नाचत होते. दरम्यान, त्याठिकाणी नाचणा-या सागर सुरेश सपकाळे याला किशोर अशोक सोनवणे या तरूणाचा धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीपर्यंत गेले. या हाणामारीत दोन्ही बाजूने लाठ्या- काठ्या व चॉपरचा वापर झाला.
रविवारी सकाळी याबाबत दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली. त्यावरुन दोन्ही गटातील प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.