एस.टी.च्या धडकेने रेल्वे गेट तुटले
By admin | Published: February 2, 2017 01:11 AM2017-02-02T01:11:23+5:302017-02-02T01:11:23+5:30
जळगाव : चोपडय़ाला जाणा:या एस.टी.बसने सुरत रेल्वे गेटला धडक दिल्याने गेट तुटले
जळगाव : चोपडय़ाला जाणा:या एस.टी.बसने सुरत रेल्वे गेटला धडक दिल्याने गेट तुटले व त्यामुळे तब्बल चार तास वाहतुकीचा खोळंबा होण्यासह पश्चिम मार्गावर जाणा:या व येणा:या अनेक प्रवाशी एक्सप्रेस व मालगाडय़ांना विलंब झाला. बुधवारी सकाळी साडे आठ वाजता हा अपघात झाला. नवजीवन व हावडा-अहमदाबाद या दोन गाडय़ांना या अपघाताचा जास्त फटका बसला. दरम्यान, याप्रकरणी बस चालक संजय पुंडलिक पाटील (वय 38 रा.गोरगावले बु.ता.चोपडा) व वाहक विजय गोपीचंद पवार (वय 40) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
चोपडा आगाराची जळगाव-चोपडा ही बस (क्र.एम.एच.40 एन.9864) सकाळी सुरत मार्गावरील दूध फेडरेशनजवळील रेल्वे गेटजवळ पोहोचली. मात्र त्याचवेळी नवजीवन एक्सप्रेस येत असल्याचा सिगAल मिळाल्याने गेटमन ललित गौतम यांनी गेट बंद केले. हे गेट बंद होण्याआधी बस अंतर पार करेल या अंदाजाने चालकाने पहिले गेट ओलांडले, परंतु दुस:या गेटला वरच्या दिशेने धडक बसल्याने जोडपासून गेट तुटले.
नवजीवन एक्सप्रेस थांबली एक तास
4गेट ला धडक दिल्यानंतर एस.टी.बसमध्येच अडकल्याने नवजीवन एक्सप्रेसला मालधक्कयाजवळच थांबविण्यात आले. सहायक अभियंता ए.बी.कोलते व सहका:यांनी तातडीने घटनास्थळ गाठून गेट दुरुस्तीचे काम हाती घेतले. एक तासानंतर बसला बाहेर काढण्यात आले व त्यानंतर नवजीवन एक्सप्रेस पुढच्या मार्गावर रवाना झाली. याचवेळी अपलाईनवर ताप्तीगंगा एक्सप्रेस व दोन मालगाडय़ा तसेच डाऊन लाईनवर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस व दोन मालगाडय़ांना विलंब झाला होता.
चार तास वाहतुकीची कोंडी
या अपघातामुळे दोन्ही बाजुंनी चार तास वाहतुकीची कोंडी झाली होती. रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक ओ.पी.कुलदीप, हेडकॉन्स्टेबल रंगलाल जाधव व चंदनसिंग यांनी दोन्ही बाजुची वाहतुक सुरळीत केल्यानंतर चार तासांनी वाहतूक पूर्वपदावर आली. दरम्यान, बस चालक संजय पाटील व वाहक विजय पवार यांच्याविरुध्द रेल्वे सुरक्षा बलात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना भुसावळ येथील रेल्वेच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची वैयक्तिक जामीनावर सुटक करुन 15 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती उपनिरीक्षक कुलदीप यांनी ‘लोकमत’ ला दिली.