महामंडळाच्या सुचनेनंतरच प्रशिक्षणार्थींना सेेवेत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:38+5:302020-12-08T04:13:38+5:30

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महामंडळाची बससेवा सहा महिने पूर्णत : बंद होती. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठींही महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे महामंडळाने ...

The trainees will be hired only after the suggestion of the corporation | महामंडळाच्या सुचनेनंतरच प्रशिक्षणार्थींना सेेवेत घेणार

महामंडळाच्या सुचनेनंतरच प्रशिक्षणार्थींना सेेवेत घेणार

Next

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महामंडळाची बससेवा सहा महिने पूर्णत : बंद होती. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठींही महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे महामंडळाने गेल्या वर्षी भरती झालेल्या चालक व वाहक उमेदवारांराची प्रशिक्षणामध्येच तात्पुरती सेवा स्थगित करण्यात आली होती. यामध्ये जळगाव विभागातील १७१ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, महामंडळाची सेवा पुर्ववत सुरू झाल्यानंतर, या उमेदवारांना पुन्हा कामावर घेण्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, सेवा सुरू होऊनही या उमेदवारांना अद्यापही सेवेत दाखल करुन घेण्यात आले नाही. त्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरती होऊनही महामंडळ कामावर घेत नसल्यामुळे, भविष्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे कधी कामावर घेणार असा प्रश्न या उमेदवारांमधुन उपस्थित होत आहे.

इन्फो :

गेल्या वर्षी भरती झालेल्या जळगाव विभागातील उमेदवारांची तात्पुरती सेवा स्थगित करण्यात आली आहे. शासनाच्या जशा सुचना येतील, तसे या उमेदवारांना सेवेत घेण्यात येईल.

प्रशांत महाजन, विभागीय कामगार अधिकारी, एसटी महामंडळ

::

इन्फो :

कोरोनाचा संसर्ग सुरू झाला, तसे जळगाव विभागातील सर्व प्रशिक्षणार्थी उमेदवारांना महामंडळाने सेवा स्थगित करुन घरी बसविले आहे. त्यामुळे पुर्णपणे बेकार झालो आहेत. महामंडळाने त्वरीत आम्हाला सेवेत घ्यावे,ही आमची मागणी आहे.

फिरोज शेख, प्रशिक्षणार्था विद्यार्थी. भडगाव.

Web Title: The trainees will be hired only after the suggestion of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.